हैद्राबादी मिरची का सालन

Ingredients

  MIRCHI KA SALAN CLOSE UP

  घटक –

   

 • १) ८ /१० हिरव्या किंवा लाल ओल्या मिरच्या
 • २) दिड कप भाजलेले शेंगदाणे
 • ३) १ टेबलस्पून पांढरे तीळ
 • ४) १ टिस्पून खसखस
 • ५) २ टेबलस्पून सुक्या खोबर्‍याचा किस
 • ६) २ टेबलस्पून चिंचेचा कोळ
 • ७) २ कांदे, बारीक चिरून
 • ८) १ टिस्पून जिरे
 • ९) ८ मिरीदाणे
 • १०) १ इन्च आले, चकत्या करुन
 • ११) १ टिस्पून लाल मिरची पावडर
 • १२) १ टेबलस्पून साखर किंवा गूळ
 • १३) चवीप्रमाणे मीठ
 • १४) तेल, लागेल तसे
 • १५) १/२ टिस्पून प्रत्येकी हळद आणि हिंग
 •  

Directions

मिरची का सालन करण्यासाठी

 

१) मिरच्यांना एका बाजूने चीर देऊन, शक्य तियक्या बिया काढून टाका.

 

२) तीळ, खसखस आणि खोबरे सोनेरी रंगावर भाजून घ्या. त्यात दाणे मिसळा आणि सर्वाची पूड करा. यापैकी अर्धी पूड बाजूला काढून त्यात थोडे मीठ आणि थोडा चिंचेचा कोळ घाला.

 

३) हे कोळ घातलेले मिश्रण, अलगद हाताने प्रत्येक मिरचीत भरा. मग मिरच्या पॅनमधे थोड्या तेलात परतून घ्या. आणि बाजूला काढून ठेवा.

MIRCHI KA SALAN MIRCHI

 

 

४) त्याच पॅनमधे आणखी थोडे तेल घालून त्यात जिरे तडतडवा.

 

५) मग त्यात मिरीदाणे, आल्याच्या चकत्या, हळद आणि हिंग घाला. मग त्यावर दाण्याची पावडर घाला.

 

६) तेल सुटेपर्यंत ती मंद आचेवर भाजा आणि मग त्यावर कापलेला कांदा घाला. सर्व तपकिरी रंगावर येईस्तो परता.

 

७) त्यात लाल तिखट घाला, आच बंद करा आणि थोडे थंड होऊ द्या.

 

८) हे सर्व थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या.

 

९) परत हे वाटण पॅन मधे गरम करत ठेवा, त्यात मीठ, उरलेला कोळ, साखर किंवा गूळ घाला.

 

१०) मंद आचेवर झाकण ठेवून ते शिजु द्या. अधून मधून तळापासून ढवळून घ्या.

 

११) तेल सुटेपर्यंत गरम करा.

 

१२) मग त्यात बाजूला ठेवलेल्या मिरच्या घाला.

 

बिर्याणी, साधा भात किंवा रोटी सोबत खा.