साबुदाण्याच्या थालिपिठाचे दोन प्रकार

Ingredients

  लागणारे जिन्नस असे –
 • १) भिजवलेले साबुदाणे २ कप
 • २) दाण्याचे कूट, एक ते दिड कप
 • ३)   एक लहान काकडी
 • ४) एक मध्यम बटाटा, उकडून सोललेला.
 • ५) १ टिस्पून भाजलेले जिरे
 • ६) ३ ते ४ हिरव्या मिरच्या वाटून
 • ७) १ ते २ टिस्पून लाल तिखट
 • ८) चवीप्रमाणे मीठ
 • ९ ) अर्धा टिस्पून साखर
 • १० ) तूप लागेल तसे
 •  

 • ११ ) सोबतच्या हिरव्या चटणीसाठी ५ हिरव्या मिरच्या, एक कप खोबरे, अर्धा कप भाजलेले दाणे, अर्धा कप कापलेली कोथिंबीर, अर्धे लिंबू, मीठ व साखर
 •  

  DSCN3962

Directions

क्रमवार पाककृती

 

१) भिजवलेला साबुदाणा हाताने मोकळा करून घ्या.

२) दाण्याचे कूट, मीठ, साखर, जिरे सर्व साबुदाण्यात मिसळून घ्या.

३) या सर्व मिश्रणाचे दोन भाग करून घ्या.

४) काकडीची साले काढून, बारीक किसून तो किस घट्ट पिळून घ्या. ( निघालेले पाणी बाजूला ठेवा.)

५) पिळलेला काकडीचा किस मोकळा करून त्यात वाटलेल्या हिरव्या मिरच्या आणि एक भाग

साबुदाण्याचे मिश्रण हलक्या हाताने मिसळा. मिश्रण मळू नका.

६) मिश्रण अगदी कोरडे वाटले तर बाजूला ठेवलेले काकडीचे पाणी , एखादा चमचा मिसळा.

 

DSCN3963

८) एका नॉन स्टीक पॅन ला थोडासा तूपाचा हात लावून घ्या व त्यावर हे मिश्रण अलगद्पणे पसरा.

९) उलथन्याने हवा तो आकार द्या. जाडीला १ सेमी पेक्षा कमी असू द्या.

१०) आता पॅन मंद आचेवर ठेवा, व थालिपिठावर पोकळ झाकण ठेवा.

११) थोड्या वेळाने झाकण काढून उलटून टाका आणि कडेने थोडेसे तूप सोडा.

१२) दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्या.

१३) उरलेल्या साबुदाण्यात कुस्करलेला बटाटा व लाल तिखट घालून, दुसरे थालिपिठ करा.

 

DSCN3968

१४) चटणीसाठी दिलेले सर्व घटक वाटून घ्या व त्यात हवे तर दहि मिसळा.

 

बटाटा न उकडता, कच्चा किसूनही वापरता येतो. उलटताना ते मोडणार नाही याची काळजी घ्या.

 

DSCN3965

शंका असल्यास लहान आकाराची थालिपिठे करा.

DSCN3972