लाल भोपळ्याचे घारगे – एक वेगळा प्रकार

 

Ingredients

  लागणारे जिन्नस :

   

 • १) अर्धा किलो लाल भोपळा,
 • २) २ कप मैदा,
 • ३) १ टिस्पून इंस्टंट यीस्ट,
 • ४) १ टेबलस्पून साखर,
 • ५) मीठ,
 • ६) तेल,
 • ७) वरुन लावण्यासाठी खसखस किंवा तीळ.
 • Pumpkin Pita (1)

   

Directions

  क्रमवार पाककृती

   

 • १) भोपळा वाफवून, कुस्करुन तो गर एका मोठ्या फडक्यात बांधून, त्यातले शक्य तितके पाणी काढून टाका.
 •  

 • २) भोपळा, मैदा, साखर, मीठ व यीस्ट असे सगळे एकत्र करून मळून घ्या. पुरीला भिजवतो तेवढे घट्ट हवे. मग त्या गोळ्याला
 • थोडे तेल लावूत, तो गोळा झाकून ठेवा.

  Pumpkin Pita pith

 • ३) साधारण पाऊण तासाने हा गोळा सैल होईल.
 • Pumpkin Pita pith aalele

 • ४) मग परत मळून त्याचे हव्या त्या आकाराचे गोळे करा.
 •  

 • ५) ते गोळे दहा मिनिटे झाकून ठेवा.
 •  

 • ६) मग हलक्या हाताने जाडसर लाटून त्यावर तीळ किंवा खसखस पेरा.
 •  

 • ७) तवा मध्यम आचेवर ठेवून त्यात हे भाजून घ्या. भाजताना तेल लावा.
 •  

  एवढी साखर वापरून हे बेताचे गोड होतील. जास्त गोड हवे असतील तर खाताना वरुन   मद किंवा मेपल सिरप घेता येईल.

  पिठात जास्त साखर घातली, तर ते फसफसण्याची शक्यता आहे.

   

   

Pumpkin Pita close up