फ्रुट फिरनी

Ingredients

  लागणारे जिन्नस असे

   

 • १) ४ ते ६ टेबलस्पून बासमती तांदूळ
 • २) ८ ते १० बदाम किंवा काजू
 • ३) ४ कप दूध ( इव्हॅपोरेटेट मिल्क उपलब्ध असेल तर तो १ टिन आणि ३ कप दूध )
 • ४) चवीप्रमाणे साखर
 • ५) केवडा किंवा इतर आवडीचा इसेन्स
 • ६ ) वर पसरण्यासाठी सुका मेवा
 • ७) आवडती फळे ( सफरचंद, केळी, पपया, आंबा, चिकू, नास्पती वगैरे ) ३ कप
 • ८) १ मोठे संत्रे
 • Fruit phirani fruits

Directions

फ्रुट फिरनी करण्यासाठी

 

१) तांदूळ आणि सोललेले बदाम वा काजू थोड्या दूधात अर्धा तास भिजत ठेवा.

२)   अर्ध्या तासाने मिक्सरवर त्याची बारीक पेस्ट करा ( फिरनीचा दाणेदार पोत आवडत असेल तर ते रवाळ वाटा.)

Fruit Phirani rice

३) मग बाकीचे दूध मिसळून ते मंद आचेवर ठेवा. सतत ढवळत शिजू द्या ( खाली अजिबात लागू देऊ नका )

४) पूर्ण शिजले कि वापरत असाल तर इव्हॅपोरेटेट मिल्क घाला आणि आचेवरुन उतरा. साखर घाला आणि नीट ढवळून घ्या.

५) संत्रे सोलून त्याच्या बिया आणि पांढरा भाग काढून टाका. आणि मग त्याची   मिक्सरवर प्युरे करून घ्या.

६) ती प्यूरे एका बोल मधे घ्या आणि त्यात फळांचे तूकडे घाला, हवीच असेल तर साखर घाला.

७) आता हे फळांचे मिश्रण ४ ते ६ ग्लासेस मधे अर्ध्यापर्यंत भरा.

Fruit phirni fruits in glass

 

८) तांदळाच्या मिश्रणात इसेन्स घाला आणि ते या फळांच्या मिश्रणावर अलगद ओता.

९) हे ग्लासेस फ्रिजमधे तासभर ठेवून थंडगार करून घ्या.

१०) खाताना वरून सुका मेवा पसरुन खा.

 

हि फिरनी दिसायलाही सुंदर दिसते आणि चवीलाही छान लागते. इव्हॅपोरेटेड मिल्क वापरले तर खमंग चव येते. तो नसेल तर

तांदूळाचा कोरडा रवा, किंचीत तूपावर सोनेरी परतून पुढची कृती करता येईल.

Fruit phirani top view