पिस्ताकतली

 

Ingredients

लागणारे साहित्य :

 

१) १ कप  पिस्ते ( साधे, सोललेले पण न खारवलेले ),

२) ५० ग्रॅम मखाणे,

Pista katali (1)

३) २ टेबलस्पून पिठीसाखर ( चवीप्रमाणे कमीजास्त ),

४) अर्धा कप सायीसकट दूध,

५) १ टेबलस्पून साजूक तूप.

 

Directions

क्रमवार पाककृती :

 

१) कढईत १ टिस्पून तूप गरम करून, मंद आचेवर मखाणे परतून घ्या. एखादा मखाणा बोटाने दाबल्यावर

त्याचा  सहज चुरा झाला पाहिजे, इतपत ते परता.

२) मखाणे बाहेर काढून त्याच कढईत पिस्ते परतून घ्या.

३) दूध गरम करुन घ्या.

४) मिक्सरमधे मखाण्यांची पूड करून घ्या.

५) त्यातच पिस्ते  घालून त्यांचीही  एकत्र पूड करा.

६) त्याच पिठीसाखर घालून, मिक्सरमधेच मिश्रण नीट एकत्र करून घ्या.

७) आता त्यात चमचा चमचा दूध घालत  मिक्सर इंचर बटण वापरून फिरवा,

मिश्रणाचा गोळा झाला कि तो बाहेर काढा व हलक्या हाताने मळा.

८) हे मिश्रण मऊसर झाले पाहिजे व त्याचे तूकडे पडता कामा नयेत, लागलेच तर

आणखी थोडे दूध घाला.

९) तूप लावलेल्या ताटात हा  गोळा थापा आणि एखाद्या वाटीने दाबून समतल करा.

साधारण अर्धा सेमी  जाडी असू द्या.

१०) धारदार सुरीने वड्या कापा आणि ताट थंड होण्यासाठी फ्रीजमधे ठेवा.

११) अर्ध्या तासानी वड्या सहज सुटून  येतील.

 

Pista katali (4)