नाचणीची यीस्ट घालून केलेली भाकरी

 

Ingredients

  लागणारे जिन्नस :

   

 • १) २ कप नाचणीचे पिठ,
 • २) अर्ध कप मैदा,
 • ३) १ टिस्पून इंस्टंट यीस्ट,
 • ४) १ टीस्पून साखर,
 • ५) मीठ,
 • ६) तेल.
 •  

Directions

  क्रमवार पाककृती.

   

 • १ ) आदल्या दिवशी रात्री नाचणीचे पिठ, मैदा, मीठ, साखर व यीस्ट एकत्र करून त्यात पाणी घालून सैलसर भिजवा.
 •  

 • २) दुसर्‍या दिवशी सकाळी ते पिठ व्यवस्थित फुगून आले असेल ( नसेल तर थोडे थांबा. )
 • Nachanichi bhakari ambavalele

 • ३) तव्यावर थोडेसे तेल घालून त्याची गोलाकार भाकरी करा. मंद आचेवर दोन्ही बाजूने भाजा.
 •  

  लसणीची चटणी, पिठले आणि ही भाकरी हा मस्त बेत जमतो. हि भाकरी जाळीदार आणि मऊसर अशी होते.

  यीस्ट वापरली नाही, तरी गरम हवामानात हे मिश्रण फुगून येईल.

   

   

   

Nachanichi bhakari close up