कारवारी पद्धतीचे रव्याचे थालिपिठ – धोड्डाक

 

Ingredients

  लागणारे जिन्नस असे.

   

 • १) १ कप रवा,
 • २) १ टेबलस्पून तांदळाचे पिठ,
 • ३) १ कांदा,
 • ४) २ हिरव्या मिरच्या, बारीक कापून,
 • ५) २ टेबलस्पून ओले खोबरे, जाडसर वाटून,
 • ६) १ टेबलस्पून साखर,
 • ७) चवीनुसार मीठ,
 • ८) १/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर,
 • ९) १ टेबलस्पून दही,
 • १०) लागेल तसे तेल.
 • dhoddok tayari

Directions

  क्रमवार पाककृती

   

 • १) कांदा किसून घ्या. ( हा मी सुचवलेला बदल आहे. कांदा किसल्याने चांगली चव येते. मूळ कृतीत तो कापून घेतात. )
 • २) आता तेल सोडून बाकीचे सर्व घटक एकत्र करून त्यात किसलेला कांदा घाला आणि हाताने एकत्र करा, पण मळू नका. आवडत असेल तर यात एक टिस्पून जिरे घाला.
 • ३) मिश्रण फारच कोरडे वाटले तर थोडेसे पाणी शिंपडा आणि मिश्रणाचे २ किंवा ३ भाग करा.
 • ४) मध्यम आचेवर तवा ठेवून याची थालिपिठे लावा आणि कडेने तेल सोडत दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर भाजा.
 • चहा सोबत खा !  

dhoddok close up