काबुली पुलाव आणि कोर्मा

Ingredients

  पुलावासाठी

   

 • १) दोन कप बासमती तांदूळ
 • २) २ टिस्पून गरम मसाला ( हा ताजा केला तर छान. वेलची, दालचिनी व मिरे घेऊन भरड कुटायचे )
 • ३) २ गाजरे
 • ४) मूठभर बेदाणे ( ते जास्त घेतात )
 • ५) २ टेबलस्पून तूप
 • ६) २ टिस्पून साखर
 • ७ ) मीठ
 • ८) २ तमालपत्रे
 • ९) १०/१२ मिरिदाणे
 • १०) वरून शिवरण्यासाठी सुका मेवा
 •  

   

  ब) कोर्मासाठी

   

 • १) अर्धा किलो मिश्र भाज्या, बेताचे तूकडे करून ( बटाटे, गाजर, कॉलिफ्लॉवर, फरसबी वगैरे )
 • २) दोन मोठे कांदे, बारीक चिरून
 • ३) १ टेबलस्पून आले लसूण पेस्ट
 •  

 • ४) एक कप फेटलेले दही
 • ५) २/३ मोठे टोमॅटो, बारीक चिरून
 • ६) आवडीप्रमाणे लाल व हिरव्या मिरच्या बारीक चिरून
 • ७) अर्धा टिस्पून हळद
 •  

  • ८) १ टिस्पून जिरा पावडर

   

 • ९) १ टिस्पून मिरी पावडर
 • १०) मीठ
 •  

   

Directions

१) तांदूळ धुवून निथळून घ्या.

२) एका मोठ्या पातेल्यात थोडे तूप तापवून त्यात तमालपत्र व मिरिदाणे टाका.

३) मग त्यावर ६ कप पाणी टाका.

४) पाण्याला उकळी आली कि त्यात तांदूळ वैरा. मीठ टाका ( हवा असल्यास मॅगी किंवा नॉरचा क्यूब टाकू शकता, मग मीठ नको )

५) झार्याने अधून मधून ढवळत अर्धा कच्चा भात शिजवा व पाणी निथळून टाका. चाळणीत पसरुन ठेवा.

मग एका मोठ्या पातेल्यात तो भात काढा. सपाट न पसरवता त्याचा डोंगर करा ( असा भात जास्त फुलतो. )

६) गाजराचे लांबट तूकडे करून घ्या.

७) भातासाठीचे उरलेले तूप   तापवून त्यात बेदाणे परतून घ्या.

८) ते बाहेर काढून त्यात गाजराचे तूकडे टाका व त्यात १ टिस्पून साखर टाका.

९) गाजरे काढून उरलेल्या तूपात उरलेली साखर टाका आणि ती सोनेरी रंगावर येऊ द्या.

१०) मग त्या तूपात गरम मसाला टाकून गॅसवरून उतरा व लगेच भाताच्या डोंगरावर ते तूप पसरून टाका.

११) आता ओट्यावर एक मोठा नॅपकिन पसरा. त्यावर भाताच्या भांड्याचे झाकण मधोमध ठेवा.

१२) नॅपकिनची समोरासमोरची टोके झाकणावर बांधून घ्या.

१३) असे नॅपकिन मधे गुंडाळलेले झाकण भाताच्या पातेल्यावर ठेवा आणि भात अगदी मंद आचेवर दम घेण्यासाठी ठेवा. ( झाकण ठेवण्याआधी भात कितपत शिजला आहे त्यावर ते बघून त्यावर पाण्याचा हबका मारा आणि मग आचेवर ठेवा )

१४) आता कोर्मा करायला घ्या. तूप तापवून त्यात कांदा गुलाबी रंगावर परता.

१५) त्यात आले लसूण पेस्ट टाका थोडे परतून हळद, जिरा पावडर व मिरी पावडर टाका.

१६) मूळ प्रकारात दही देखील याच वेळी टाकतात पण आपल्याकडचे दही कदाचित फाटण्याची शक्यता आहे, म्हणून मग टाका.

१७) आता त्यात भाज्या टाका, पुरेसे पाणी टाकून भाज्या शिजू द्या.

१८) मग मीठ, टोमेटो आणि मिरच्या टाका.

१८) थोडे आटवा आणि दही टाका.

 

१९) आता प्लेटमधे मधोमध कुरमा घ्या. त्या सभोवतीने भात वाढा.

२०) भातावर गाजर, बेदाणे व सुका मेवा पसरा.

२१) या भाताला एक छान सुगंध येतो ( ऑफिसमधे २/४ जण नुसत्या वासामूळे डोकाऊन गेले )

Kabuli Pulao 1