इथिओपियन पाव

 

Ingredients

लागणारे जिन्नस

पावासाठी.. ( हे प्रमाण माझ्या ब्रेडमेकरचे आहे. )

१) ५६० ग्रॅम मैदा २) १ टिस्पून इंस्टंट यीस्ट ( हि यीस्ट खसखसीसारखी दिसते. ती थेट पावाच्या मिश्रणात मिसळता येते. दुसरी इंस्टंट यीस्ट असते ती पांढर्या मोहरीसारखी दिसते. ती मात्र कोमट पाण्यात दहा मिनिटे ठेवून मग पिठात मिसळावी लागते. ) ३) २ टेबलस्पून मिल्क पावडर ( ही माझ्या ब्रेडमेकरची गरज. इतरवेळी दूध पाणी वापरता येते.) ४) १ टिस्पून मीठ ५) १ टेबलस्पून साखर ६) ३०० मिली साधे पाणी

इतर

७) २ मोठे कांदे अगदी बारीक चिरून ८) २ टेबलस्पून तेल ९) २ टेबलस्पून तूप

१०) इथिओपियन बर्बेर मसाला ( मला हा तयार मिळाला. लाल मिरच्या आणि काही मसाले घालून हा बर्यापैकी तिखट असा मसाला ते करतात. त्याची कृतीपण नंतर देतो. अगदीच पर्याय वापरायचा असेल तर कोल्हापुरी चटणी किंवा मालवणी मसाला वापरता येईल. )

Directions

क्रमवार पाककृती

 

१) पावासाठी दिलेले जिन्नस एकत्र करून चांगले मळून घ्या. ब्रेड मेकर न वापरता जर साधा अवन वापरून किंवा थेट गॅसवर भाजून करायचा असेल तर पाण्याचे प्रमाण थोड म्हणजे ५० मिली वाढवा. )

२) ते मिश्रण झाकून उबदार जागी ठेवा.

३) एका कढईत चिरलेला कांदा परतायला घ्या ( कोरडाच. तेल तूप आता घालायचे नाही ) तो गुलाबी झाला कि त्यात तेल टाका.

४) मग त्यात मसाला टाकून मंद आचेवर परता. नंतर तूप टाका ( तूप नको असेल तर आणखी १ टेबलस्पून तेल घ्या )

हे मिश्रण मंद आचेवर बेताचेच भाजा. फ़ार करपवू नका कारण हा मसाला पावासोबत भाजला जाणार आहे.

 

५) हे मिश्रण मग थंड करत ठेवा. ( मी यात थोडी काळी खसखस घातलीय. छान लागली )

६) पावाचे मिश्रण आता फुगून दुप्पट झाले असेल. ते परत मळून परत फुगण्यासाठी थेट ज्या पॅनमधे पाव भाजायचा आहे त्यात घालून झाकून ठेवा. ( पॅनला आधी तेलाचा हात लावा. )

७) दुसर्यांदा पिठ वर आले कि त्यात थंड झालेले कांद्याचे मिश्रण हलक्या हाताने मिसळा ( अगदी एकजीव मिसळले तर स्वाद जास्त खुलेल पण कदाचित पाव भाजताना नीट फुगणार नाही ) असे अलगद मिसळल्यावर पावाच्या मधे मधे हा मसाला लागतो.

८) मग हे पॅन अगदी मंद आचेवर ठेवा. पाव भाजत आला कि मस्त दरवळ सुटतो. ब्रेड मेकरवर बघावे लागत नाही.

 

हा पाव  अत्यंत चवदार लागतो. भाजत आला कि त्याचा मसालेदार दरवळ घरभर येत राहतो. नुसत्या चहासोबत देखील

खाता येतो.

 

१) ब्रेड मेकरच्या पॅनमधला ब्रेड

bread in pan

२) डीशमधे काढलेला ब्रेड

bread in dish

३) एक स्लाईस कापल्यावर

bread cut

४) बशीतल्या स्लाईसेस

bread slices