अळीवाचे लाडू

 

Ingredients

  लागणारे साहित्य :
 • १) २०० ग्रॅम अळीव,
 • २) २ नारळ,
 • ३) पाव किलो गूळ, ( आवडीनुसार जास्तही घेता येईल.)
 • ४) ४ वेलच्या ( ऐच्छिक ),
 • ५) १ टेबलस्पून तूप.

Directions

  क्रमवार पाककृती :

   

 • १ ) एका मोठ्या भांड्यात अळीव घ्या.
 • २) नारळ फोडून त्यातील पाणी  अळीव मधे घाला.
 • ३) १५/२० मिनिटांनी नारळातील खोबरे (पाणी न वापरता ) बारीक वाटून घ्या आणि तेही अळीवात मिसळून घ्या.
 • ४) गूळ बारीक करुन या मिश्रणात मिसळा. वापरत असाल तर त्यात वेलची पूड करून घाला.
 • ५) एका मोठ्या भांड्यात तूप गरम करा आणि त्यात वरील सर्व मिश्रण घाला.
 • ALiv laDu (1)

 • ६) मध्यम आचेवर सतत ढवळत रहा. थोड्याच वेळात गूळ पातळ  झाल्याने मिश्रण सैल होईल.
 • ७) १५ ते २० मिनिटात ते घट्ट होत जाईल. तोपर्यंत सतत ढवळत रहा.
 • ८) मग आचेवरुन भांडे उतरून घ्या आणि मिश्रण थोडे निवले कि लाडू वळा.
 •  

  हे लाडू मऊसर होतात आणि ५/६ दिवसच टिकतात. जास्त टिकाऊ लाडू करायचे असतील तर  सुके

  खोबरे वापरून, गूळाचा पाक करून हे लाडू करावे लागतील.

 

ALiv laDu (2)