Ingredients
लागणारे जिन्नस असे
१) ४ रायवळ आंबे,
२) अर्धा अननस किंवा अननसाचा १ टिन,
३ )काप्या फ़णसाचे १०/१२ गरे
४) अर्धा नारळ,
५) १ टेबलस्पून धणे,
६) २/३ सुक्या मिरच्या,
७) चवीप्रमाणे मीठ,
८) १ टेबलस्पून तेल
९) अर्धा टिस्पून मोहरी,
१०) गरज वाटलीच तर थोडी साखर.
Directions
क्रमवार कृति
१) ताजा अननस वापरत असाल तर तो सोलून तुकडे करुन घ्या.
२) गर्यातील बिया काढून टाका.
३) आंबे सोलून घ्या.
४) धणे आणि लाल मिरच्या किंचीत गरम करून घ्या.
५) ओले खोबरे, धणे आणि ओले खोबरे, एकत्र अगदी बारीक वाटून घ्या.
६) एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी घाला.
७) ती तडतडली कि त्यात अननसाचे तूकडे परता.
८) मग त्यात फ़णसाचे गरे घाला आणि दोन कप पाणी घाला,.
९) गरे नीट शिजले कि त्यात वाटण घाला आणि त्याला एक कढ आला कि आंबे घाला.
१०) चवीनुसार मीठ आणि हवीच असेल तर साखर घाला.
११) नुसती गरम करा पण फ़ार उकळू नका.
१२) साध्या भातासोबत खा.
या सर्व फ़ळांचा एकत्र स्वाद फ़ार सुंदर लागतो. मीठ मिरची बेताचेच असू द्या. या फ़ळांचीच चव लागली
पाहिजे.