माव्याचा अनारसा / Mawa ka Anarsa

For English version, please scroll down

 

 

mawyacha anarasa close up

अनारसा हा आपल्या अगदी कौतुकाचा विषय. दिवाळीच्या फराळात जसा तो हवा तसा

अधिक महिन्यातल्या जावयाच्या वाणातही हवा.

आपण नेहमी तांदळाच्या पिठाचा अनारसा करतो पण रुचिरामधे गव्हाच्या चीकाचा आणि

खोबर्‍याचाही आहे.

 

पण तरीही अनारसा या शब्दाचा थोडा गोंधळ आहे. या शब्दाचा खरा अर्थ मला बिनिवाले यांच्या

पुस्तकात सापडला. अनारसा म्हणजे अनार-सा म्हणजेच डाळिंबासारखा. याच नावाचा आणि

गोल आकाराचा अनारसा ( कधी कधी याचा उच्चार ईनारसा असा करतात ) उत्तरेकडे करतात.

 

बिहारमधले गया शहर आणि पाकिस्तानातले अटक ( इतिहासातले अटकेपार झेंडे, हा संदर्भ

असावा बहुतेक ) इथले अनारसे प्रसिद्ध आहेत. गया मधे तो पावसाळ्यात करतात. अटक मधे

जत्रेच्या वेळेस करतात.

 

 

 

आपण जसे तांदूळ तयार करून घेतो, तसेच यासाठी करुन घ्यावे लागतात. पण साखरेचे

प्रमाण खुपच कमी असते. हा माव्याशिवायही करतात. मी मावा तर घातलाच आहे, शिवाय

आत सुक्या मेव्याचे सारणही भरले आहे ( अशी कृती मी कुठे बघितली नव्हती, मला सुचले

ते करून बघितले. )

 

 

 

तांदुळ कसे तयार करायचे ते ज्यांना माहीत नसेल, त्यांच्यासाठी..

 

तांदूळ धुवून पाण्यात भिजत घालायचे. रोज पाणी बदलायचे. तिसर्या दिवशी ते निथळून

सावलीत वाळवायचे. मग ते जरा दमट असतानाच कूटायचे किंवा दळायचे ( जात्यावर

नीट दळले जात नाहीत ) मिक्सरवर पिठ होते. हे पिठ चाळून घ्यायचे.

 

यासाठी मावा वापरायचा आहे, तो भारतात सहज मिळू शकतो. तो पण घरी करायचा

असेल तर एक कप मिल्क पावडर, एक टिस्पून साजूक तूप आणि १ टेबलस्पून दूध

एकत्र करुन, मंद आचेवर आटवायचे किंवा मायक्रोवेव्ह अवन मधे ३/४ मिनिटे गरम

करायचे ( दर अर्ध्या मिनिटाने बाहेर काढून ढवळायचे. )

 

पिठीसाखरही हवी, ती तयार असेल तर चांगलेच. घरी करायची असेल तर ती

बारीक करताना त्यात वेलचीचे दाणे घालायचे.

 

लागणारे जिन्नस असे

 

१) १ कप तांदळाचे पिठ ( वरील प्रमाणे तयार करून घेतलेले. )

२) अर्धा कप मावा, ( बारीक करून. बाजारचा असेल तर किसून, पंख्याखाली वाळवून )

३) १/३ कप पिठीसाखर

४) थोडेसे दूध

५) लागेल तसे तूप वा तेल

६) वरुन लावायला तीळ किंवा खसखस

 

mawyacha anarasa ingredients

 

( गोड पदार्थ तूपात तळायचे असा आपला समज आहे पण रिफाईंड तेलात तळले तर जास्त चांगले,

साजूक तूप फार कमी तपमानाला जळते आणि त्याचा जळकट वास लागतो. तूपाचा स्वाद हवा असेल

तर तळताना तेलात थोडे साजूक तूप घालावे. )

 

वर लिहिल्याप्रमणे सुक्या मेव्याचे सारण पुर्णपणे ऐच्छिक. जर ते करायचे असेल तर आपल्या आवडी

नुसार सुका मेवा घ्या. त्यात थोडे खजूर असू द्यात. ५/६ सुपारीएवढे गोळे होतील एवढा सुका

मेवा असावा.

मी बदाम, पिस्ते, वेलची, चायनीज जुजुबे ( हे खजुराप्रमाणेच असतात ) आणि चायनीज वूल्फबेरीज

घेतल्या आहेत.

 

कृती :-

 

१) तांदळाचे पिठ, मावा एकत्र करून माव्याचे कण मोडून घ्या.

२) मग त्यात पिठीसाखर मिसळून, एखादा टेबलस्पून दूध घालून अगदी घट्ट भिजवून झाकून ठेवा.

३) वापरत असाल तर सुक्या मेव्याचे तुकडे करून, त्यात खजूराचा गर मिसळून, सुपारीएवढे

गोळे करून ते हाताने दाबून थोडे चपटे करून घ्या.

 

 

४) १५/२० मिनिटाने भिजवलेले पिठ थोडे सैल झाले असेल ( या तांदळाच्या पिठात बराच

दमटपणा असतो. त्याने पिठीसाखरेला पाणी सुटते व पिठ सैल होते ) तसे झाले नसेल

तर थोडी साय मिसळा. फारच सैल वाटत असेल तर थोडे पिठ मिसळा.

( पिठ जास्तीचे हाताशी असू द्या. नाही वापरले तरी वाया जात नाही. या पिठाचे आटवल, खीचू

किंवा उकड फार छान लागते.)

 

mawyacha anarasa process

 

 

५) हाताला थोडेसे तूप लावून, या पिठाचे छोटे छोटे गोळे करा ( वापरत असाल तर त्यात सारणाचा

गोळा भरा.)

५) तेल वा तूप तापत ठेवा. ते मध्यम आचेवर तापले कि एकेक गोळा अर्धा तीळात वा खसखशीत घोळवा

आणि तेलात सोडा.

६) आपल्या अनारश्याप्रमाणे किंवा इतर तळणीच्या पदार्थाप्रमाणे हे अनारसे हलके होऊन तेलात तरंगत

नाहीत. ते मध्यम आचेवर झार्‍याने हलवत त्यावर थोडे तेल ( वा तूप ) उडवत तळावे लगतात. तळताना

मोडू नयेत याची काळजी घ्यावी लागते.

आच नेमकीच असणे फार महत्वाचे आहे. ती कमी असेल तर अनारसा विरघळेल आणि जास्त असेल तर

बाहेरून करपेल आणि आत कच्चा राहील. तळताना तो आतपर्यंत शिजला पाहिजे.

 

 

७) हे अनारसे तळताना तूप पित नाहीत त्यामूळे बाहेर काढल्यावर तूप सोडतही नाहीत.

 

८) गरमागरम अनारसा खायला फार रुचकर लागतो. ८/१० दिवस सहज टिकतो.

mawyacha anarasa inside close up

 

 

साहित्याचे प्रमाण काटेकोर घ्यायला हवे. साखर जास्त झाली तरी अनारसा तळणीत हसतो.

मूळ कृतीत हे तीळातच घोळवतात पण तळताना त्यातले बरेचसे तीळ तेलात उतरतात,

म्हणून मी खसखस वापरलीय ( ती कमी उतरते. )

 

Mawa ka Anarasa

mawyacha anarasa dish

 

 

 

 

Anarasa is a special sweet dish, prepared on special occasions like Diwali in Maharashtra.

The process is little elaborate and there is always a risk of not getting it right.

But it is different version, that the one prepared in North, especially Gaya in Bihar. That version

Lives up to its name, as it looks like Anar (pomegranate)

I am presenting that version here ( The Maharashtrian version is like a flat thick bread ) I have stuffed dry fruits in this version, though it can be made without any stuffing.

This version uses lesser sugar than the Maharashtrian version, but the process of making rice flour is the same.

You need to ferment the rice for three days.   Wash and soak the rice in water and keep it for three days.   Change the water, every day. ( Drain the water completely and add fresh water. ) On the fourth day, drain the water and spread the rice on a napkin and dry them indoors. When they are still moist, grind them to a fine powder. ( This rice flour can be used to make various other dishes like khichoo.)

As the name suggests, you will need mawa ( khoya) for this recipe. In India, it is readily available, in case you want to make it at home, there is a simple process. ( the original process requires evaporating the milk on fire, stirring continuously ) . You can mix one up milk powder, with 1 teaspoon ghee ( clarified butter ) and 1 tablespoon milk. And microwave it for 3 to 4 minutes. Remove from microwave oven, every 30 seconds and mix well. ( You may obtain the desired consistency before time, hence this checking is required. ) This mixture can also be heated on slow fire, stirring continuously to get the mawa ( khoya).

 

 

For Anarasa you need..

1) 1 cup rice flour ( prepared as above.)

2) ½ cup mawa (khoya)

3) 1/3 cup ground sugar

4) Little milk

5) Oil for frying

6) Sesame or poppy seeds for coating

( For deep frying, it is better to use oil than ghee. The ghee burns at lesser temperature and these Anarasa require more time for frying. In case you want the ghee flavor, you can add few tablespoons of ghee to oil, while frying. )

As written above, the stuffing is optional. In case you decide to stuff your anarasa, you can take chopped dry fruits of choice. To bind them together, you need soft seedless dates. Mix the dry fruits with dates and roll out small marble size balls, about 5 to 6 )

 

To make Anarasa..

1) Dry mix together the rice flour and mawa ( khoya ) and make sure that there are no lumps.

2) Then add the ground sugar and 1 tablespoon milk and bind together is form of tight dough, keep covered for 15/20 minutes.

3) After mixing the dough will be very hard, but the moisture from rice will dissolve the sugar and after

It will become soft to handle. Do not overdo the kneading part.

4) If you still find it is very hard, you can add a teaspoon milk. In case it has become too soft, add dry rice flour.

5) Grease your palms with little ghee and roll out lemon size balls of this dough. If you are using the stuffing, make an insertion in this ball, insert the stuffing and cover it completely with dough.

 

6) Heat enough oil in a pan. Take the sesame seeds or poppy seeds in a bowl and cover half the portion of anarasa with them. You need to press the seeds a little, so that they stick to the anarasa. ( In any case some of the seeds, will loose while frying. The poppy seeds stick better than sesame seeds. )

 

7) These anarasas will not float in oil while getting fried. You need to splash the hot oil on them with a slotted spoon. You must maintain the flame at medium level, too low heat will break the anarasa and too high will burn them. )

8) Once they turn golden on all the sides, remove from oil and drain the excess oil. You can enjoy them hot or cold. Can be kept up to 8/10 days.

 

 

 

 

 

आमरसाची खांडवी / Steamed mango cake

For English version, please scroll down

Amras khandavi close up

 

 

 

 

लागणारा वेळ:

१ तास

लागणारे जिन्नस:

१) दोन वाट्या आमरस

२) एक वाटी बारीक रवा

३) अर्धा टिस्पून तूप

४) चहाचा (सपाट) चमचा इनो सॉल्ट.

 

यापुढचे सगळे घटक ऐच्छीक

 

५) चवीप्रमाणे साखर (मी अजिबात वापरलेली नाही.)

६) स्वादासाठी, वेलची किंवा केशर

७) एक कण मीठ

८) दोन टेबलस्पून ओले खोबरे

९) काजूचे किंवा बदामाचे काप

 

 

क्रमवार पाककृती:

 

१) आंब्याचे तूकडे करुन घ्या.

२) मग ते मिक्सरमधे ब्लेंड करुन घ्या. (साखर वापरणार असाल तर त्यातच मिसळून घ्या.)

Amras khandavi mango pieces in mixer

 

३) मंद आचेवर, रवा कोरडाच गुलाबी भाजा. वापरत असाल तर काजुचे काप, वेलची , मीठ वगैरे रव्यातच मिसळा.

 

Amras khandavi roasted semolina

 

४) रवा चांगला गार झाला की आमरसात नीट मिसळून घ्या.

Amras khandavi mixture

 

 

५) अर्धा तास मिश्रण मुरु द्या. मग ते कितपत जाड वा पातळ आहे ते बघा. इडलीच्या पिठाप्रमाणे हवे. लागलाच तर त्यात आणखी रवा किंवा आमरस (वा पाणी मिसळा.) रवा कितपत जाड बारीक आहे आणि आमरस कितपत दाट आहे, याव्र हे ठरेल.

६) कूकरच्या डब्याला तूपाचा पातळसा थर लावा. कूकरमधे पाणी ऊकळत ठेवा.

७) पाण्याला ऊकळी आली की इनो फृट सॉल्ट मिश्रणात टाकून, भराभर ढवळा आणि डब्यात ओता. वापरत असाल तर ओले खोबरे वर पेरा. ८) डबा लगेच कूकरमधे ठेवा, आणि प्रेशर न ठेवता झाकण लावा. २० ते २५ मिनिटे वाफवा.

९) मग डबा बाहेर काढून, पुरता थंड होऊ द्या, मग अलगद एका ताटात काढा

Amras khandavi mould

१०) हव्या त्या आकाराचे तूकडे कापून खा.

 

वाढणी/प्रमाण:

४ जणांसाठी

अधिक टिपा:

 

आमच्याकडचे आंबे पुरेसे गोड असतात त्यामूळे साखर घातली नाही. पण ते स्वादाला कमी असल्याने, केशर घातलेय.
Steamed mango cake

Amras khandavi dish

 

 

 

What you need..

 

1) 2 cups mango pulp ( I have made the pulp by blending mango pieces. In case you use tinned mango pulp, you need to use less sugar, or you may even avoid it totally. The mangoes, I used

Were sweet, hence I did not use any sugar.)

 

2) 1 Cup fine semolina

 

3) ½ teaspoon ghee ( clarified butter )

 

4) 1 teaspoon Eno fruit salt

 

All the ingredients listed now on, are optional

 

5) Sugar as per taste ( You can add at the last minute, before adding ENO fruit salt. As this is a steamed cake, it will get sweeter on steaming and as frozen desert, you need not add extra sugar. ( the low temperature makes your taste buds .) )

 

6) A Pinch of cardamom powder or saffron

 

7) A pinch of salt.

 

8) 2 tablespoon fresh coconut

 

9) Sliced cashew nuts or almonds

 

 

To proceed –

 

1) If you are using fresh mango, blend the pieces in mixer, if you are using sugar, blend with it. ( If you are using tinned pulp, skip this step.)

3) Dry roast semolina, till it turns pink. Mix the cardamom, saffron, salt with semolina. If using dry fruits slices, add now. (Reserve some for topping.)

4) Cool the semolina completely and add the mango pulp to it, and keep aside for half an hour.

 

5) After half an hour, check the consistency of the batter. It should be like Idli batter. Add water or

dry semolina to adjust the consistency.

 

6) Put the pressure cooker on medium flame and add enough water. Put the stand in the cooker, and let the water boil. Grease one separator (dabba) With little ghee.

7) When the water starts boiling, reduce the heat. Mix the ENO salt with batter and immediately pour it in the separator. Put the separator on stand in the cooker and close the cooker with lid ( without the vent weight. )

8) Steam for 20 to 25 minutes. Put off the fire. Open the lid and let it cool for a while.

9) Invert into a plate and cut into pieces in desired shape.

Enjoy with some dry fruits.

बदाम खसखस शिरा / Almond + poppy seeds halawa

For English version, please scroll down

 

रुचिरा मधे खसखस शिरा आणि बदाम शिरा असे दोन स्वतंत्र पदार्थ आहेत. तसे ते स्वतंत्र मला रुचण्यासारखे नव्हते, म्हणून ते दोन्ही पदार्थ शिवाय आपला नेहमीचा शिरा यांचा हा संयोग !

Badam khuskhus shira dish

 

 

 

लागणारे जिन्नस असे

 

१) अर्धी वाटी खसखस

२) अर्धी वाटी बदाम

३) १ वाटी रवा

४) अर्धी वाटी साखर ( आवडीप्रमाणे कमीजास्त, मी स्टीव्हीया वापरलेय )

५) २ टेबलस्पून तूप

६) २ ते ३ कप दूध किंवा पाणी + मिल्क पावडर ( खसखसीमूळे ताजे दूध कदाचित फाटू शकते. म्हणून मिल्क पावडर )

आवडीप्रमाणे सुका मेवा.

क्रमवार पाककृती

१) बदाम व खसखस एकत्र पाण्यात भिजत घाला.

Badam khuskhus shira soaked

 

२) मग ते अगदी बारीक वाटून घ्या ( हौस असेल तर बदाम सोला, पण गरज नाही )

Badam khuskhus shira ground

 

 

३) रवा नेहमीप्रमाणे तूपावर गुलाबी रंगावर भाजून घ्या.

 

४) तो बाहेर काढून, बदाम खसखसीचे वाटण, मंद आचेवर अगदी मोकळे होईपर्यंत भाजून घ्या.

Badam khuskhus shira roasted

 

५) मग त्यात रवा घाला.

 

 

 

६) नीट मिसळून त्यात मिल्क पावडर टाका, थोडा वेळ सर्व एकत्र परतून त्यात आधणाचे पाणी घाला.

 

७) झाकण ठेवून शिजू द्या.

 

८) मग त्यात साखर घालून नीट मिसळा, व साखरेचे पाणी मुरेपर्यंत शिजवा.

 

 

९) वरुन सुका मेवा पसरुन खा.

 

 

 

( मग ताणून देणे आवश्यक आहे )

 

हा शिरा अंगावर येतो, म्हणून बेताने खा !

 

Almond + poppy seeds halawa

 

Let us spoil ourselves by having this calorie rich halawa.

Badam khuskhus shira close up

 

 

 

You will need –

1) ½ cup poppy seeds

2) ½ cup almonds

3) 1 cup semolina

4) ½ cup sugar ( more or less as per your taste )

5) 2 tablespoon ghee ( clarified butter )

6) 2 to 3 cups milk ( or water + milk powder, There is chance that normal milk may get separated when mixed with poppy seeds, hence using milk powder will be better. )

1/4 cup other dry fruits for topping ( optional )

 

To proceed

 

1) Soak the almonds and poppy seeds in water for 1 hour.

2) Grind to a fine paste. ( I you prefer, you can peel the almonds, before grinding )

3) Using 1 tablespoon ghee, roast the semolina till it turns pink in color

4) Remove semolina and add the almond paste to the pan, add remaining ghee and cook on low flame, stirring continuously, till it resembles loose bread crumbs.

5) Add back the semolina to the almond mixture and mix thoroughly on low flame.

6) Add the milk powder mix well and then add 2 cups hot water. ( If using milk, heat it and then add to the mixture. )

7) Stir well, cover and cook on low flame.

 

8) Add the sugar, again mix well and cook till the sugar is absorbed in the mixture.

 

Top with chopped dry fruits.

Though not necessary, you can add little cardamom powder or saffron, if you wish. ( Add it with sugar.)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

बोलानी – अफगाणी पराठा / Bolani – Paratha from Afganistan

For English version, please scroll down

Bolani dish

 

 

बोलानी हा अफगाणी पराठ्याचा प्रकार. पण करायला अगदी सोपा तरीही चवदार. यात वापरलेल्या भाजीचा अस्सल स्वाद या पराठ्यात उतरतो. अफगाणिस्तानात हा गंदाना नावाची पालेभाजी वापरून करतात. तिला पर्याय म्हणून मी लीक ही भाजी वापरली आहे. तूम्ही भारतात पातीचा कांदा, शेपू, मेथी, पालक, मूळ्याचा कोवळा पाला वगैरे वापरू शकाल.

 

१) २ कप कणीक

२) बारीक चिरलेली भाजी २ कप ( मेथी वापरणार असाल तर फक्त पाने खुडून घ्या, चिरू नका )

३) तेल

४) मीठ

 

सोबतच्या चटणीसाठी आवडीनुसार मिरची, कोथिंबीर, दही, लसूण, मीठ असे एकत्र वाटून घ्या.

 

क्रमवार पाककृती

 

 

१) चपातीला भिजवतो तशी कणीक मळून घ्या.

२) भाजी नीट करून गरज असेल तर चिरून घ्या.

३) कणकेचे बेताच्या आकाराचे गोळे करून त्याच्या पातळ चपात्या लाटा.

 

४) मग तिला तेलाचा पुसटसा हात लावा व तिच्या अर्ध्या भागावर सारण पसरा, व त्यावर मीठ घाला ( आधीच भाजीला मीठ लावू नका, तिला पाणी सुटेल )

Bolani veg spread

 

 

५) मग दुसरा भाग त्यावर दुमडा ( चंद्रकोरीसारखा आकार ) वरून हाताने अलगद दाब द्या. कडा जुळवायची गरज नाही.

 

६) मग तव्यावर मंद आचेवर बोलानी भाजून घ्या. ( एका वेळेला दोन भाजता येतात. )

 

Bolani veg folded

 

७) कुरकुरीत होईस्तो भाजा मग तिचे त्रिकोणी तुकडे करून खा. सोबत चटणी घ्या. त्यासाठी मिरची, कोथिंबीर, लसूण एकत्र वाटून दह्यात मिसळा. व त्यात मीठ घाला.

 

 

 

 

Bolani – Paratha from Afganistan

Bolani close up

 

 

Bolani is a very tasty paratha from Afaganistan. It is very simple to make. For stuffing they use a

Special vegetable called gandam. You can use spring onion, dill, mint leaves, methee, radish leaves etc.

 

What you need –

 

1) 2 cups whole meal flour ( atta )

 

2) 2 cups chopped green leafy vegetable of choice. ( If using methi leaves, do no chop them )

I have used leek for this recipe

 

Bolani veg cut leek

 

3 ) Oil

4) Salt, as per taste.

 

You can grind together chilies, garlic, fresh coriander together, add salt and yoghurt to it, to make the accompanying chutney.

 

 

To make bolani

 

1) Knead a soft dough, by adding little oil, salt and water to the flour.

2) Wait for 15/20 minutes and then make lemon size balls of the dough.

3) Roll out a thin chapatti and spread the chopped vegetable over half part of it, sprinkle with some salt. ( Do not mix salt to the cut vegetable in advance )

4) Fold over the other half of chapatti over it and press well.

5) Roast on low flame, till it turns golden and crisp. Apply little oil, while roasting.

 

Enjoy with chutney.

कोथु रोटी -श्रीलंकन स्ट्रीट फूड / Srilankan Kothu Roti

लागणारा वेळ:

३० मिनिटे

लागणारे जिन्नस:

कोथु रोटी म्हणजे कापलेली रोटी. हा श्रीलंकेतील एक लोकप्रिय खाद्यप्रकार आहे. पण हा प्रकार जेवणावर खात नाहीत ( जेवण म्हणजे भात आणि करी ). साधारण आपल्या फोडणीच्या चपातीसारखा प्रकार पण जरा खमंग. मी शाकाहारी प्रकार देत असलो तरी यात अंडे आणि चिकनही घालतात. अंडे थेट वापरतात तर चिकन करी वेगळी करून मग मिसळतात..

 

यासाठी रोट्या करतात, त्यापण आपल्या चपातीपेक्षा वेगळ्या असतात. मैदा सैलसर भिजवून त्याचे गोळे करतात. मग ते गोळे हाताने आपटत आपटत विस्तारतात. या पोळ्या पूर्ण भाजलेल्या नसतात. भाजताना एकावर एक अश्या टाकत जातात, आणि अश्या अर्धवट भाजलेल्या रोट्यांचे चॉपरने बारीक तूकडे करतात.

अर्थात आपल्या चपात्या, फुलके किंवा अरबी खबूसही वापरता येतील. मला इथल्या तूर्की रेस्तराँ मधे अशी रोटी मिळाली, मी तिच वापरली.

Sri lankan kothu roti dish

 

 

 

तर लागणारे जिन्नस असे,

 

१) तयार रोट्या किंवा पर्याय.

२) ओबड धोबड कापलेल्या भाज्या ( यात कांदा, कोबी, गाजर, मिरच्या वगैरे घ्या )
३) आवडता मसाला ( तिथे त्यांची करी पावडर वापरतात. जरा तिखटच असते ती. ) मिरची पावडरही चालेल.
४) मीठ, तेल, कढीपत्ता
सर्व साहित्य आपल्या आवडीप्रमाणे

 

क्रमवार पाककृती:

 

१) तयार रोटीचे तूकडे करून घ्या.

Sri lankan kothu roti cut up

 

 

२) भाज्याही कापून घ्या

 

 

Sri lankan kothu roti vegetables

 

( मूळ कृतीत आंबट पणासाठी काही घालत नाहीत. माझ्याकडे कैरी होती म्हणून मी तिचे तूकडेही घेतलेत )

३) कढईत तेल तापवून कढीपत्ता व नंतर त्यात सर्व भाज्या एकदमच टाका ( आधी कांदा परतून घ्यायचा नाही. सर्व भाज्या करकरीतच हव्यात )

 

४) त्या जरा शिजल्या कि मसाला टाका मीठ टाका आणि रोटीचे तूकडे टाका. ( अंडे वापरत असाल तर भाज्यांवर फोडून घाला. )

 

५) नीट परतून सर्व मिसळून घ्या.

 

आणि गरमागरम खायला घ्या. हा प्रकार रुचकर लागतोच शिवाय पोटभरही होतो. मी फार कमी तेल वापरलेय, तिथे जरा जास्त वापरतात.

वाढणी/प्रमाण:

ज्या प्रमाणात साहित्य घ्याल तसे.

अधिक टिपा:

फोडणीत राई, जिरे, हिंग पण वापरू शकता. पण भाज्यांचा नैसर्गिक स्वाद लपणार नाही, एवढेच मसाले वापरा.

 

 

माहितीचा स्रोत:

प्रत्यक्ष श्रीलंकेत बघून आणि चव घेऊन, केलेले प्रयोग.

 

 

 

Sri Lankan Kothu Roti

Sri lankan kothu roti close up

 

 

Kothu Roti is very popular street food of Sri Laanka. It is made with cut up roti and lot of vegetables, eggs, chicken curry etc are added. It is filling and tasty dish. I am presenting a vegetarian version.

 

You can use any roti ( flat bread ) pita bread etc. I have used Turkish bread here.

 

The Rotis used in Sri Lanka are slightly different. They are made of plain flour and are flattened by lifting and dropping them repeatedly on flat surface. Then they are roasted half way and then cut up into small pieces, with chopper.

 

They make it little hot by using their curry powder, still the quantities of vegetables is almost equal to that of roti.

 

 

What you need…Actually there is no fixed quantities here, what I am listing here is just suggestions.

 

1) 2 readymade Rotis

 

2) Roughly chopped vegetables ( Onion, cabbage, carrots, chilies etc )

 

3) 2 teaspoon curry powder or chili powder,

 

4) Salt to taste

 

5) few curry leaves

 

6) 2 tablespoon oil

 

 

 

 

To make kothu roti

 

1) Cut up the roti into small pieces.

 

2) Cut all vegetables roughly.

 

( I have used few pieces of raw mango, in original version it is not used. )

 

3) In a pan heat the oil and add the curry leaves.

 

4) Add all the vegetables at once, and add salt and curry powder and chili powder.

 

5) Mix and cook the vegetables just for 2 minutes, Do not overcook them, They should

remain crunchy.

 

6) Add the rotis, mix and cook for few minutes and serve hot.

 

You can add mustard seeds, cumin seeds etc with curry leaves, if desired. The more variety of vegetables you use, the better it is.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

श्रीलंकन पद्धतीची भेंडीची भाजी / Sri Lankan style bhendi

For English version, please scroll down

 

Sri Lankan bhendi bhajee dish

 

 

लागणारा वेळ:

३० मिनिटे

 

लागणारे जिन्नस:

 

मी श्रीलंकेत स्थानिक जेवणच जेवत होतो. त्यात नेहमी एक रस्साभाजी आणि एक परतून केलेली भाजी असे. त्या परतून केलेल्या भाजीची हि रेसिपी. इथे भेंडी वापरलीय पण मी या प्रकारे केलेली वांग्याची आणि कारल्याची भाजीही खाल्ली आहे. त्याही छान लागतात.

 

१) पाव किलो भेंडी

२) २ टेबलस्पून तेल

३) एक मध्यम आकाराचा कांदा

४) एक मध्यम आकाराचा लाल टोमॅटो

५) मीठ

६) लाल तिखट किंवा आवडीचा मसाला

७) १ टिस्पून जिरे

८) कढीपत्ता

 

क्रमवार पाककृती:

 

१) भेंडीचे मध्यम आकाराचे तूकडे करून घ्या.
२) तेलाची जिरे व कढीपत्ता घालून फोडणी करा व त्यात ते तूकडे परतून घ्या.
३) त्यावर मीठ, मसाले टाका आणि नीट परतून घ्या.
४) भाजी थोडी थंड झाली की कांदा व टोमॅटोचे उभे तूकडे करून अगदी आयत्यावेळी मिसळा.

झाली भाजी तयार.

 

तिथे जेवणावर चपाती नसते. भातासोबत ही भाजी छान लागते.

तिथे ते त्यांची करीपावडर वापरतात. ती बर्‍यापैकी तिखट असते. तूम्ही आवडीचा मसाला वापरू शकता. नेहमी वापरता त्यापेक्षा मीठ व मसाले थोडे जास्त वापरा कारण ते कांदा आणि टोमॅटोलाही पुरले पाहिजेत. टोमॅटो कापताना बिया वगळा पण त्याला मीठ लावू नका. कांदा व टोमॅटोला पाणी सुटता कामा नये.

मला स्वतःला कच्चा कांदा आवडत नाही. म्हणून मी तो कापून बर्फाच्या थंड पाण्यात तासभर ठेवला आणि मग निथळून घेतला. असा कांदा करकरीत राहतो पण चवीला सौम्य होतो. आवडत असेल तर तसे करु शकता.

 

वाढणी/प्रमाण:

 

४ जणांना पुरेल. एरवी परतून केलेल्या भाज्या चोरट्या होतात, हि मात्र तशी होत नाही.

 

अधिक टिपा:

 

हवे तर भाजीत चाट मसाला किंवा आमचूर पावडरही घालू शकता. कारल्याचे काप कुरकुरीत करता येतात. वांगी वा भेंडी तशी होत नाही. मुंबईला सुकवलेली भेंडी मिळते, ती वापरूनही अशी भाजी करता येईल.

श्रीलंकेत मालदीव फिश लोकप्रिय आहे. हा मासा शिजवून सुकवलेला असतो. त्याचे तूकडे जेवणात स्वादासाठी वापरतात. तूम्हाला आवडेल तो सुका मासाही या प्रकारात वापरू शकता. तो भाजीसोबतच परता.

फोटोसाठी म्हणून मी खोबरे वापरलेय, पण ते नाही वापरले तरी चालेल.

 

माहितीचा स्रोत:

प्रत्यक्ष घेतलेली चव आणि मग केलेली चौकशी 🙂

 

 

Sri Lankan style Bhendi ( Ladies fingers )

Sri Lankan bhendi bhajee close up

 

 

 

 

During my recent visit to Sri Lanka, I tasted many local vegetarian dishes and just loved them. Though they are bit spicy, I enjoyed them. They generally use Maldive fish for flavouring, which of course, I was requesting them to avoid.

Their curry powder is very tasty too, and they use it in such type of preparations. You can use any curry powder or even plain chilli powder.

 

What you need –

 

1) 250 gms bhendi ( ladies fingers)

2) 2 tablespoon oil

3) 1 onion

4) 1 red tomato

5) salt to taste

6) 1 teaspoon curry powder or chilli powder

7) 1 teaspoon cumin seeds

8) Few curry leaves

 

To proceed

1) Cut the bhendi into 3 cm pieces

 

2) Heat the oil in pan and add cumin seeds and then curry leaves.

 

3) Add the bhendi pieces, fry a little and then add salt and curry powder or chili powder.
4) When it cools down a little, add the pieces of onion and tomatoes, just before eating.

Enjoy with rice.

 

1) I have added some grated fresh coconut and ground nuts.

2) You can also use brinjal (eggplant ) or karela ( bitter guard ) instead of bhendi.

3) You can use aamachoor ( dry mango powder ) or chat masala in this preparation.

4) If you prefer you can tone down the smell and taste or raw onion, by keeping the slices in ice cold water for 10 minutes, and use after draining them.

 

 

Hin Htote from Myanmar / ( Vegetarian version )

For English version, please scroll down

Hin htote dish 2

 

 

 

 

लागणारा वेळ:

३० मिनिटे

लागणारे जिन्नस:

Hin Htote from Myanmar, हा एक पदार्थ यू ट्यूबवर बघितला आणि करून पहावासा वाटला. छान लागला म्हणून इथे शेअर करतोय.

म्यानमार म्हणजेच पुर्वीचा ब्रम्हदेश. आपला सख्खा शेजारी. आपल्याकडच्या काही राज्यांसारखा भातखाऊ. तसे भातखाऊ अनेक देश आहेत पण या देशाची खासियत म्हणजे तिथे पोहे केले जातात. ही पोहे करायची पद्धत मात्र तिथून पुर्वेकडच्या देशात नाही.

लोकमान्यांना स्थानबद्ध करुन ठेवलेले मंडाले इथलेच शिवाय नृत्याप्सरा हेलनही इथलीच.

हा प्रकार करायला खुपच सोपा आहे. चवीला मात्र खासच आहे.

 

लागणारे जिन्नस असे.

१) पातीच्या कांद्याची १ जुडी ( भारतात मिळते तेवढी. कापून ३ ते ४ कप होईल एवढी ) २) २ मध्यम टोमॅटो ३) दिड कप तांदळाचे पिठ वा २ कप तांदळाचा रवा ( इडली रवा चालेल ) ४) मीठ ५) २ टेबलस्पून तेल ६) १ टिस्पून लाल तिखट किंवा २/३ लाल मिरच्यांची भरड पूड ( फ्लेक्स ) चवीप्रमाणे कमीजास्त ७) १ टिस्पून तीळ ८) १ टिस्पून बारीक केलेला लसूण ९) शक्य असल्यास केळीची पाने

 

क्रमवार पाककृती:

 

१) टोमॅटो बारीक चिरून एका जाड बुडाच्या भांड्यात टाकून भांडे गॅसवर मध्यम आचेवर ठेवा ( तेल घालायचे नाही.) २) ते जरा शिजले कि गॅस बंद करा. ३) पातीचा कांदा बारीक चिरून त्यात टाका. ( थोडा सजावटीसाठी वगळा ) ४) मीठ टाकून हलक्या हाताने कांदा चुरा ५) मग त्यात तांदळाचे पिठ वा रवा टाका आणि इडलीच्या पिठाएवढे थलथलीत होईल एवढे पाणी वा ताक टाका. ६) ५/१० मिनिटे थांबून ( इडली रवा असेल तर १५/२० मिनिटे ) केळ्याच्या पानाचे छोटे तुकडे करून त्यात १ टेबलस्पून मिश्रण टाकून ते टूथपिकने बंद करा. केळीची पाने नसतील तर इडलीपात्रात्म प्रत्येक भागात एक दोन टेबलस्पून मिश्रण टाका. ७) केळीच्या पानाचे द्रोण वा इडली पात्र प्रेशर न ठेवता १५/२० मिनिटे वाफवा. ८) बाकीचे तेल गरम करा, ते तापले कि त्यात तीळ टाका. ते तडतडले कि गॅस बंद करून त्यात तिखट वा फ्लेक्स आणि मग लसूण टाका. ( मूळ कृतीत तीळ व लसूण नाहीत ) ९) फोडणीत २ टेबलस्पून पाणी टाका. १० ) शिजलेल्या मिश्रणाचे तूकडे करा ( भगरा झाला तरी चालेल. इडली रवा वापरला असेल तर भगराच होईल. यात फुगण्यासाठी कुठलाच घटक वापरलेला नसल्याने हे मिश्रण फुगणार नाही ) ११) यावर वरचे मिरचीचे तेल टाकून खा. सजावटीसाठी वगळलेला कांदा वापरा. ( मी सिमला मिरची वापरलीय, तसेच पातीच्या कांद्याच्या जागी, लीक वापरलीय. )

 

वाढणी/प्रमाण:

२ जणांना न्याहारी म्हणून

अधिक टिपा:

यात पोर्क वगैरे पण वापरतात. पण हे अर्थातच शाकाहारी व्हर्जन.

माहितीचा स्रोत:

यू ट्यूबवर व्हीडीओ आहे.

 

Hin Htote from Myanmar / ( Vegetarian version )

This a popular dish from Myanmar. I have created a vegetarian version of the original dish by omitting the meat. I have also spiced it up a little by adding garlic and sesame seeds.

 

 

Hin htote dish

 

 

 

What you need.

1) 3 to 4 cups, chopped spring onion

2) 2 ripe tomatoes, chopped

3) 1 ½ cup rice flour or 2 cups Idli rawa

4) Salt to taste

5) 2 tablespoon oil

6) 1 teaspoon red chili powder or chili flakes

7) 1 teaspoon sesame seeds

8) 1 teaspoon chopped garlic

 

Few banana leaves, if possible. You can use Idli stand, in stead.
To proceed

 

1) Take the chopped tomatoes in a pan, and heat them on low flame.

2) When they soften, put off the heat.

3) Add chopped spring onion to it (reserve some for topping.)

4) Add salt and slightly crush the spring onion, and add rice flour or Idli rawa to the mixture,

add enough water ( or butter milk ) to make a smooth batter ( like idli batter ).

5) Keep the mixture aside for 5 to 10 minutes I using rice flour ( You need to keep it for 15 to 20 minutes, if you are using Idli rawa. ) If you are using banana leaf, cut them into squares of 8 x 8 inches.

Put 2 to 3 tablespoon of this mixture and tie the leaf in form of a parcel. You can put the batter in Idli stand also. ( As this mixture is not fermented, it will not puff up. That is normal. It should be very soft though.)

6) Steam the parcels or the idli stand, for 15 to 20 minutes and let them cool.

7) Heat the remaining oil and add sesame seeds, when they pop up, put off the flame and add the garlic, chili flakes or powder. Then add 2 tablespoon water to the mixture.

 

8) Open the parcels or remove the steamed mixture from the Idli stand and break into big chunks.

 

9) Pour the chili oil over it and sprinkle with reserved chopped spring onion.