शेवभाजी

 

Ingredients

लागणारे जिन्नस असे

 

१) मुख्य म्हणजे शेव २ कप भरून. हि शेव जाडी आणि तिखट पाहिजे. भावनगरी शक्यतो नको कारण ती लवकर विरघळते. याच कारणासाठी अगदी बारीक शेवही वापरता येत नाही. आपल्याकडच्या फरसाणच्या दुकानात हि असतेच. दिवाळीच्या पदार्थातली शेवही वापरता येईल. हि शेव ताजी व कुरकुरीत असावी.SHEVBHAJI SHEV

२) १ मोठा कांदा

३) अर्धी वाटी खोबर्‍याचा किस

४) ८/९ लसूण पाकळ्या

५) अर्धा इंच आले

६) आवडीप्रमाणे लाल तिखट किंवा लाल मिरच्या

७) १ टिस्पून जिरे

८) २ टिस्पून धणे

९) १ टिस्पून गरम मसाला ( हा ताजा केला तर चांगले. त्यासाठी मिरी, लवंगा, दालचिनी, वेलची, दगडफूल घ्या. )

१० ) तेल

११) फोडणीचे साहित्य ( हिंग, हळद, मोहरी )

१२) कोथिंबीर

१३) मीठ

 

Directions

क्रमवार पाककृती:

१) लाल मिरच्या घेतल्या असतील तर त्या आणि तर ताजे मसाले खमंग भाजून घ्या. व त्याची पूड करा

२) खोबर्‍याचा किसही भाजून घ्या

३) कांदा उभा चिरून तेलात लालसर परतून घ्या. ( हल्ली वाळवलेला कांदा मिळतो. तो वापरला तर पटकन भाजला जातो. तो २ टेबलस्पून पुरेल )

४) खोबरे, आले, लसूण व कांदा यांचे बारीक वाटण करा. ( मिक्सरमधे आधी खोबरे आणि मग कांदा, आले, लसूण वाटावे लागेल. )

५) या वाटणात पूड व गरम मसाला मिसळा.

६) थोड्या तेलाची फोडणी करून त्यात मसाला परतून घ्या. त्यात हवे तेवढे पाणी घालून रस्सा उकळू द्या. बेताचे मीठ व कोथिंबीर घाला. ( शेवेत मीठ असतेच, त्या मानाने मीठ घाला. )

७) पाणी थोडे जास्तच घाला कारण शेव घातल्यावर रस्सा दाट होतो.

८) अगदी खायच्या वेळेला त्यात शेव टाका आणि २/३ मिनिटे उकळा.

९) भाकरी किंवा चपाती सोबत खा.

 

हा रस्सा तिखटच असतो. यात आंबटपणासाठी काहिही ( टोमॅटो, चिंच ) घालत नाहीत. तसेच गूळ वा साखरही घालत नाहीत. हवे तर सोबत कच्चा कांदा आणि लिंबू घ्या.

हा मसाला आधी करुन ठेवता येतो. पाणी न घालता वाटला तर हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमधे अगदी महिनाभरही टिकेल.

SHEVBHAJI DISH2

ह्याच मसाल्याचे पाणी उकळून त्यात कच्ची अंडी फोडून घातली तर अंड्याचा रस्सा तयार होईल.

कोथिंबीर फोडणीत, रस्सा उकळताना किंवा वरूनही घेता येईल.

 

 

 

7 thoughts on “शेवभाजी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s