Ingredients
लागणारे जिन्नस :
१) ३ शेवग्याच्या शेंगा,
२) २ टेबलस्पून तेल,
३) १ टिस्पून मेथी दाणे,
४) १ टेबलस्पून मोहरी,
५) १ टिस्पून हिंग,
६) १ टिस्पून हळद,
७) १ टिस्पून लाल तिखट,
८) १ टेबलस्पून साखर,
९) अर्धा कप व्हीनीगर,
१०) चवीप्रमाणे मीठ
Directions
क्रमवार पाककृती
१) शेवग्याच्या शेंगांची साले काढून, १ इंचाचे तुकडे करुन घ्या.
२) कढईत तेल तापवून त्यात मेथी लाल करुन घ्या आणि मग मोहरी घाला.
३) मोहरी तडतडली कि, हिंग आणि हळद घाला आणि शेवग्याच्या शेंगाचे तुकडे परतून घ्या.
४) शेंगा सोनेरी रंगावर परतून घ्या.
५) मग त्यात तिखट, मीठ घालून परता आणि वर व्हीनीगर घाला.
६) व्हीनीगर मधे शेंगा चांगल्या शिजू द्या.
७) मग त्यात साखर घाला आणि तेल वेगळे दिसेपर्यंत शिजवा.
८) मग मिश्रण आचेवरुन उतरवा आणि थंड झाले कि बाटलीत भरुन ठेवा.
९) हे लोणचे लगेच खाता येते पण जर आठवडा भराने खाल्ले तर शेंगा छान मऊ होतात.
साखरेमूळे व्हीनीगर चा वास पुर्णपणे जातो. हेच लोणचे व्हीनीगर ऐवजी चिंचेचा कोळ
आणि साखरेऐवजी गूळ घालूनही करता येते. तसेही चांगले लागते.