Ingredients
लागणारे जिन्नस :
१) ४ ब्रेडच्या स्लाईसेस, कडा काढलेल्या. ( होल ग्रेन ब्रेड असल्यास उत्तम.)
२) १ टेबलस्पून कुठलाही जॅम किंवा मार्मलेड,
३) १ टेबलस्पून बटर,
४) १ लाल सफ़रचंद,
५) १ टिस्पून साखर,
६) २ टेबलस्पून मिल्क पावडर,
७) सजावटीसाठी आवडता सुका मेवा आणि फ़ळे ( मी बदाम, वूल्फ़ बेरीज आणि अवाकाडो वापरले आहे )
Directions
क्रमवार पाककृती
१) सपाट तव्यावर अगदी मंद आचेवर पावाच्या स्लाईसेस ठेवा.
२) एका कपात जॆम किंवा मार्मलेड घेऊन त्यावर अर्धा कप उकळते पाणी ओता.
३) त्यातच बटर घाला आणि चमच्याने मिश्रण नीट ढवळून घ्या.
४) ब्रेडच्या स्लाईसेस दोन्ही बाजूने सोनेरी झाल्या कि त्यावर हे जॅम आणि बटर चे मिश्रण पसरुन घाला.
५) मग आच बंद करा आणि स्लाईसेस थोड्या थंड होऊ द्या.
६) सफ़रचंदाच्या बिया काढून, ते सालासकट किसून घ्या.
७) त्या किसात १ टिस्पून साखर घालून मंद आचेवर शिजत ठेवा.
८) साखर विरघळून सफ़रचंद थोडे शिजले कि त्यात मिल्क पावडर घालून ढवळा आणि आचेवरुन काढा.
९) मग हे मिश्रण ब्लेण्ड करुन घ्या. हि झाली रबडी.
१०) ब्रेडचे हव्या त्या आकारात तुकडे करुन एका प्लेटमधे माण्डा, त्यावर वर केलेली रबडी पसरुन घ्या.
११) मग त्यावर सुका मेवा आणि फ़ळांची सजावट करा.
हा प्रकार गरम किंवा थंड पण चांगला लागतो.