Ingredients
लागणारे जिन्नस असे.
१) दोन वाट्या मूग + मसूर डाळ ( अर्धा तास भिजवून ) २) १ वाटी उडीद डाळ ( अर्धा तास भिजवून ) ३) एक मोठा कांदा, ऊभा चिरून ४) २ लाल टोमॅटो बारीक चिरून ५) २ ओल्या मिरच्या, ऊभ्या चिरून ६) २ टेबलस्पून तेल ७) २ टेबलस्पून तूप ८) ४/५ लसुण पाकळ्या, ऊभ्या चिरून
मसाल्यासाठी १) एक टिस्पून जिरे २) १ टिस्पून धणे ३) १ टिस्पून मिरी ४) लिंबूफूल ( सायट्रीक अॅसिड ) ४/५ कण ( याचे साखरे सारखे स्फटीक असतात. ) ५) अर्धा टिस्पून हळद ६) १ टिस्पून लाल तिखट ७) अर्धा टिस्पून अजिनोमोटो (चायनीज सॊल्ट) किंवा डार्क सोया सॉस
८) दोन टेबलस्पून शेपूच्या भाजीची बारीक चिरलेली पाने, ती नसतील तर १ टिस्पून बाळ शेपा ( दिल सीड्स ) (शेपूची सुकवलेली पाने पण आता मिळतात, ति वापरायची असतील तर एक टेबलस्पून पुरेत.)
९) ३ हिरव्या वेलच्या १०) एका मसाला वेलचीचे फक्त दाणे ११) मीठ
Directions
१) भिजवलेली उडदाची डाळ चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्या. पाणी स्वच्छ निघेपर्यंत धुवा. २) उडदाची डाळ व मूग / मसूर डाळ एकत्र करून त्यात थोडी हळद घालून शिजवा. शक्यतो कूकरबाहेर शिजवा म्हणजे गरगट्ट होणार नाही.
४) मसाल्याचे कोरडे जिन्नस ( शेपूची पाने व सोया सॉस वगळून ) किंचीत गरम करून घ्या. आपण मसाले भाजतो तितपत भाजायचे नाहीत. फक्त गरम करायचे. मायक्रोवेव्ह अवन मधे ३० सेकंद सर्व मसाले गरम केले तरी चालतील. (हळद आणि मीठही गरम करायचे ) मग भाजलेले जिन्नस अर्धे बोबडे कुटून घ्या. मग त्यात शेपूची पाने व सोया सॉस मिसळून ठेवा. ( शेपूची पाने वा बाळशेपा पर्याय आहेत. बाळशेपा घेतल्या असतील तर भाजायच्या. शेपूची पाने तशीच वापरायची आहेत. )
५) एका कढईत तेल तापवून त्यात कांदा मंद आचेवर सोनेरी करून घ्या. मग त्यात मिरची व लसूण टाका आणि लगेच तयार केलेला मसाला परता.
६) खमंग वास सुटला कि त्यावर टोमॅटो टाका आणि तेल सुटेपर्यंत परता.
७) मग त्यावर एक टेबलस्पून तूप टाकून वर शिजलेली डाळ टाका.
८) हलक्या हाताने ढवळा व मंद आचेवर कढ येऊ द्या.
९) खाण्यापुर्वी राहिलेले तूप गरम करून वरून ओता.
१०) ही डाळ नानसोबत छान लागते.
Aflatoon lagte hi dal…
ThNks dinesh da…
LikeLike
Thanks Geetanjali !
LikeLike