Ingredients
यासाठी लागणारे साहित्य
अ ) कोफ्त्यांसाठी
- १) एक जुडी पालक ( फक्त पाने ) २) दिड कप बेसन ३) १ टेबलस्पून तेल ४) अर्धा टिस्पून प्रत्येकी जिरे, हिंग, हळद ५) २ हिरव्या मिरच्या ६) अर्धा कप दूध ७) अर्धा इंच आले, चकत्या करून ८) मीठ
या कोफ्त्यांमधे आपण सारणही भरू शकतो. तसे करायचे असेल तर थोडे काजू, बेदाणे.
ब) करीसाठी
१) अर्धा किलो कच्चे , हिरवे टोमॅटो २) २/३ हिरव्या मिरच्या ( चवीप्रमाणे कमीजास्त ) ३) ५/६ लसूण पाकळ्या ४) १ टेबलस्पून तीळ ५) १ टेबलस्पून भाजलेले दाणे ६) मूठभर कोथिंबीर ७) मीठ ८) थोडी साखर ९) तेल
Directions
१) पालकाची पाने, हिरव्या मिरच्या, दूध आणि आले, मिक्सरमधे वाटून घ्या. २) कढईत तेल तापवून त्यात हिंग, जिरे, हळद यांची फोडणी करा व त्यात बेसन जरा परतून घ्या. ३) त्यात सर्व कोफ्त्यांना लागेल एवढे मीठ टाका. ४) बेसन खमंग भाजले कि त्यात पालकाचे मिश्रण टाकून भराभर हलवा. ५) थोड्याच वेळात याचा गोळा जमेल, तसे झाले कि आचेवरून उतरून ठेवा. ६) हाताळण्या एवढे निवले कि त्याचे घट्ट कोफ्ते करा. सारण वापरत असाल तर यावेळी कोफ्त्याच्या आत भरा.
७) हिरवे टोमेटो कापून घ्या. ८) तेलाची फोडणी करून त्यात मिरच्या व लसूण टाका, मग त्यावर तीळ टाका. ९) ते तडतडले कि टोमॅटो टाका, व थोडे परता. १०) प्रखर आचेवर शिजू द्या. ११) मग त्यात कोथिंबीर टाकून गॅस बंद करा.
१२) त्यात मीठ, साखर घालून सर्व मिश्रण ब्लेंड करून घ्या.
१३) वाढायच्या वेळी, एका पॅनमधे थोडे तेल तापवून कोफ्ते हलक्या हातानी ढवळा, ते विरघळणार नाहीत याची काळजी घ्या.
१४) करी परत गरम करून घ्या. सर्व्हींग बोलमधे करी घेऊन त्यावर कोफ्ते हळूच टाका ( कोफ्ते घालून करी गरम करायची नाही ) कोफ्ते परतलेल्या तेलात थोडी कोथिंबीर टाकून ते तेल गरम असतानाच करीवर शिंपडा.