वाघ्रा


Ingredients

यासाठी लागणारे साहित्य
१) २ वाट्या पांढर्या मक्याचे सुकलेले दाणे / किंवा ताज्या कणसाचे तेवढे दाणे
२) मीठ
३) १/२ टिस्पून सुंठ किंवा मिरपूड किंवा १ टिस्पून आल्याचा किस
४) फोडणीचे साहित्य यात तूप किंवा तेल आणि हिंग / जिरे / लाल मिरच्या / कढीपत्ता / तीळ
५) ३ वाट्या दही

 


Directions

१) यातली सर्वात महत्वाची कृती म्हणजे मक्याचे दाणे शिजवणे. हे दाणे शिजून फुटणे आवश्यक आहे. सुके मके वापरले तर ते अर्थातच रात्रभर भिजवून घ्यावे लागतील. मग ताजे किंवा असे भिजवलेले मक्याचे दाणे कूकरमधे घेऊन त्यात अडीजपट पाणी व मीठ घालून कूकर गॅसवर ठेवा. प्रेशर आले कि गॅस मंद करून मिनिटे मोजा ( शिट्या नाहीत ) ताजे दाणे असतील तर १५ मिनिटे आणि सुकवलेले असतील तर २५ मिनिटे शिजवा. असे शिजले पाहिजेत.

vaghra cooked २) मग कूकर उघडून हे दाणे जरा थंड होऊ द्या. ३) मग त्यात दही मिसळून जरा वेळ बाजूला ठेवा ( हे दाणे दही शोषून घेतील ) मग त्यात सुंठ किवा मिरपूड घाला ४) तुपाची फोडणी करून ती थंड झाल्यावर मक्यावर ओता. आणि खाऊन टाका. हा प्रकार खुप रुचकर आणि पोटभरीचा होतो. चावून चावूनच खावा लागतो. चाट मसाला घालूनही चांगला लागेल. फार घट्ट झाला तर आणखी ताक / दही घालता येईल.

 

vaghra close up

 

3 thoughts on “वाघ्रा

  1. अमेरिकन कॉर्न वापरलं तर चालेल का? हल्ली पांढरा मका बघायला सुद्धा मिळत नाही तो वापरल्यास इतका वेळ शिजवायची गरज आहे का?

    Like

  2. नमस्कार सुप्रिया, शिजवलेल्या मक्यात दही मुरणे आवश्यक आहे, अमेरिकन कॉर्न फुटेपर्यंत शिजवला तर चालू शकेल, पण त्यात आले किंवा मिरपूड जास्त घालावी लागेल. हा प्रकार गोडसर नसतो.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s