Ingredients
- तर लागणारे जिन्नस असे.
- १) पाव किलो कोहळा २) २ कप दूध ३) साखर आवडीप्रमाणे ४) १ टेबलस्पून तूप ५) सुका मेवा आवडीप्रमाणे
Directions
क्रमवार पाककृती:
१) कोहळा किसून घ्यावा. ( कोहळा किसताना खुप पाणी सुटते. )
२) जाड बुडाच्या भांड्यात तूप तापवून त्यात हा किस, त्याला सुटलेल्या पाण्यासकट घालावा.
३) मंद आचेवर झाकण ठेवून शिजवून घ्यावा.
४) मग शक्य तितके पाणी आटवून टाकावे आणि त्यात दूध व साखर घालावी.
५) वरुन सुका मेवा घालावा.
गरज वाटलीच तर वासासाठी वेलची वगैरे घ्यावी. मला या खिरीत रोझ इसेन्स आवडतो.
