नेपाली दम आलू


Ingredients

  तर लागणारे जिन्नस असे.
 • १) अर्धा किलो बटाटे
 • २) पाव किलो पिकलेले टोमॅटो
 • ३) १ टेबलस्पून टोमॅटो पेस्ट
 • ४) १ टेबलस्पून पंच फोडण ( यात नेमके काय असावे याचा विचार न करता, आपल्याकडे असतील त्यापैकी, राई, जिरे, मेथी, बडीशेप, कलौंजी , तीळ वगैरे घ्यावेत )
 • ५) काश्मिरी लाल तिखट.. अर्थात आवडीप्रमाणे. पण ही भाजी जरा जास्त तिखट करतात. सुक्या काश्मिरी मिरच्याभिजत घालून, त्याची वाटून केलेली पेस्ट केल्यास जास्त चांगले )
 • ६) फोडणीसाठी तेल. शक्य असल्यास राईचे.
 • ७) मीठ

Directions

  क्रमवार पाककृती:
 • १) बटाटे अर्धे कच्चे उकडून त्याच्या फोडी करून घ्या.
 • २) टोमॅटो बारीक कापून घ्या.
 • ३) तेल तापवून त्यात पंच फोडण टाका, ते तडतडले पाहिजे.
 • ४) मग त्यावर टोमॅटोच्या फोडी टाका व परतत रहा.
 • ५) त्या फोडी गळून गेल्या कि टोमॅटो पेस्ट टाका. व लाल तिखट ( वा पेस्ट ) टाका.
 • ६) मग त्यात पाणी टाका व पाण्याला उकळी आली कि मीठ व बटाट्याच्या फोडी टाका.
 • ७) बटाट्याच्या फोडी शिजेपर्यंत उकळा.
 • Nepali Dum aaloo 2

  तिथे ही भाजी घट्ट किंवा पातळ अश्या दोन्ही प्रकारे खाल्ली. फुलक्यासोबत खाताना पातळसर तर नुसती खाताना घट्ट. कांदा, लिंबू, कोथिंबीर असले लाड नव्हते. ( अर्थात तूम्ही करू शकता. )

 

2 thoughts on “नेपाली दम आलू

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s