लागणारे साहित्य : – १) २ वाट्या चण्याची डाळ, – २) १ वाटी उडदाची डाळ, – ३) अर्धी वाटी तांदूळ, – ४) पाव वाटी गहू, – ५) पाव वाटी लाल मोहरी, – ६) २ टिस्पून जिरे, – ७) २ टिस्पून धणे, – ८) १ टिस्पून मिरी, – ९) ३/४ लाल मिरच्या, – १०) २ इंच सुंठ, – ११) १ हळकुंड, – १२) अर्धे जायफळ, – १३) चिंचोक्याएवढा हिंगाचा खडा. क्रमवार पाककृती : – १) सर्व धान्ये कोरडीच भाजायची आहेत. चण्याची व उडदाची डाळ गुलाबी होईपर्यंत. तांदूळ पांढरे अपारदर्शक होईपर्यंत. गहू तडतड वाजेपर्यंत आणि मोहरी पांढरट होईपर्यंत भाजायला हवी. – २) धणे, जिरे व मिरी पण असेच खमंग भाजून घ्यायचे आहे पण ते अजिबात करपू द्यायचे नाहीत. – ३) हळकुंड, सुंठ, हिंग आणि जायफळ यांचे तूकडे करून ते धान्यासोबतच भाजून घ्यावेत. मिरच्यांचे पण तूकडे करून धान्यासोबत भाजायच्या आहेत. – ४) हे सर्व जसजसे भाजून होईल, तसतसे एका कागदावर काढून घ्यायचे आणि कागदानेच झाकून ठेवायचे. – ५) ते जरा निवले कि बारीक दळून मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचे आणि मग घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवायचे. मेतकूट खाण्याचे अनेक प्रकार आहेत. कोकणातील पारंपारीक न्याहारी म्हणजे मऊ भात, तूप, मीठ आणि मेतकूट. कुठल्याही मेन्युसोबत तोंडीलावणे म्हणून मेतकूट, मीठ, दही व लाल तिखट घेता येते. दही नको असेल तर मेतकूटात मीठ, कांदा व तेल घालूनही खातात. गरमागरम भाकरीवर तूप, मीठ आणि मेतकूट घालून छान लागते. टोस्ट ब्रेड बटरवर पण मेतकूट घालून खाता येते. Ingredients
Directions
मेथी नाही घालायची?मेथीमुळे फार छान स्वाद व खमंगपणा येतो.
LikeLike
नमस्कार सुप्रिया,
या कृतीत मेथी नाही, मोहरी व जिऱ्यामुळे थोडा कडवटपणा येतो. आता हे वर्षभर पुरेल, परत करेन तेव्हा नक्की मेथी वापरेन.
LikeLike
नमास्कर दिनेश सर , माझ्या विनंती प्रमाणे मेतकूट रेसिईपी धन्यवाद !!!!
मला काही शंका आहेत
१) माझ्या कडे काळी मोहोरी आहे , तर ती वापरली तर चालेल का?
२) हिंग खडा नाही पण पावडर आहे, जी आपण रोज वापरतो, तर ती चालेल का?
३) मेथी दाणे वापरल्यास मेतकूट कडू होते हा माझ्या सासूबाईंच्या अनुभव होता .
LikeLike
नमस्कार,
काळी मोहरी चालेल, पण भाजून साले पाखडून टाकली तर चांगले. खडा हिंग पावडर पण चालेल, पिवळी असेल तर थोडी जास्त घ्या पण मेथी नकोच.
LikeLike