तुरीच्या दाण्याचे कळण


Ingredients

  लागणारे साहित्य :

  turiche kaLaN (1)

 • १) दोन वाट्या तुरीचे हिरवे ताजे दाणे,
 • २) २ मध्यम आकाराचे कांदे,
 • ३) २ मध्यम आकाराचे टोमॅटो,
 • ४) २ लहान बटाटे,
 • ५) ४/५ हिरव्या मिरच्या, ( आवडीप्रमाणे कमीजास्त )
 • ६) १ टेबलस्पून दही,
 • ७) २ टिस्पून धणा जिरा पावडर,
 • ८) १ टिस्पून हळद,
 • ९) लसणाच्या ८/१० पाकळ्या,
 • १०) १ टिस्पून हिंग,
 • ११) मीठ,
 • १२) २ टेबलस्पून तेल,
 • १३) १ टिस्पून गूळ किंवा साखर,
 • १४) थोडी कोथिंबीर.

Directions

  क्रमवार पाककृती :
 • १ ) गॅसच्या फ्लेमवर थेट कांदे, मिरच्या, टोमॅटो व लसूण भाजून घ्या. ( पापड भाजायची जाळी असेल तर त्यावर हे सर्व एकाचवेळी भाजता येईल.
 • turiche kaLaN (2)

 • २) बटाट्याची साले काढून त्याच्या मोठ्या फोडी करा.
 • ३) एका पॅनमधे तुरीचे दाणे कोरडेच थोडे भाजून घ्या, आणि बाहेर काढून घ्या.
 • ४) कांद्याची साले काढून घ्या व लसूणही सोलून घ्या, मग कांदे आणि लसूण एकत्र जाडसर वाटून घ्या.
 • ५) एका प्रेशर पॅनमधे तेल गरम करून त्यात हिंग व हळद घाला आणि वरचे कांदा आणि लसूण यांचे वाटण घाला.
 • ६) मंद आचेवर ते परतत रहा.
 • ७) दरम्यान टोमॅटो, मिरच्या आणि अर्धे तुरीचे दाणे जाडसर वाटून घ्या.
 • ८) कांद्याचे मिश्रण चांगले परतले कि त्यावर दही फेटून घाला आणि परतून घ्या.
 • ९) मग त्यावर टोमॅटॉचे वाटण घालून तेल वेगळे दिसेपर्यंत परता.
 • १०) मग त्यात बटाट्याच्या फोडी, उरलेले तुरीचे दाणे, मीठ, धणा जिरा पावडर घाला आणि नीट मिसळून घ्या.
 • ११) त्यात २ ते ३ कप पाणी व गूळ किंवा साखर घाला आणि झाकण लावून प्रेशरखाली ५ मिनिटे शिजवा.
 • १२) मग त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
 • turiche kaLaN (5)

  हे कळण पातळ केले तर सूप प्रमाणेही पिता येईल. दाटसर केले तर चपाती किंवा भातासोबत खाता येईल.


turiche kaLaN (4)

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s