Ingredients
- लागणारे साहित्य :
- १) १ कप तुरीची डाळ,
- २) २ टिस्पून तांदूळ,
- ३) १ टिस्पून कणीक,
- ४) ६/७ हिरव्या मिरच्या,
- ५) १ टेबलस्पून जिरे,
- ६) १०/१२ लसूण पाकळ्या,
- ७) १ कप कोथिंबीर,
- ८) १/२ टिस्पून बेसन,
- ९) २ मोठे टोमॅटो,
- १०) २ टेबलस्पून तेल,
- ११) १ टिस्पून मोहरी,
- १२ ) १ टिस्पून हळद,
- १३ ) १ टिस्पून हिंग,
- १४) १ टिस्पून लाल तिखट,
- १५) मीठ.
Directions
क्रमवार पाककृती :
१) डाळ व तांदूळ, एकत्र करुन पाण्यात भिजत ठेवा. ( अर्धा ते १ तास ).
२) तव्यावर जिरे व हिरव्या मिरच्या, थोड्या भाजून घ्या.
३) टोमॅटो थेट गॅसवर धरून जरा भाजून घ्या आणि सोलून त्याचे बारीक तूकडे करा.
४) जिरे, मिरच्या, कोथिंबीर व लसूण यांचा जाडसर ठेचा करा व त्यात मीठ घाला.
५) त्यापैकी १ टिस्पून ठेचा बाजूला ठेवा आणि उरलेल्या ठेच्यात बेसन मिसळून त्याचे बोराएवढे गोळे करून ठेवा.
६) डाळ व तांदूळ निथळून रवाळ वाटून घ्या. त्यात कणीक, तिखट, मीठ, १/२ टिस्पून हळद व अर्धा टिस्पून हिंग मिसळून घ्या.
७) हाताला थोडे तेल लावून डाळिचे थोडे मिश्रण घ्या, त्यात ठेच्याचा गोळा ठेवून तो डाळीच्या मिश्रणाने लपेटून घ्या.
( ही कृती ऐच्छिक आहे. सर्व एकत्र करूनही गोळे करू शकता. )
८) १ मोठ्या भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी घाला, मग बाजूला ठेवलेला ठेचा घाला आणि परता.
९) उरलेली हळद आणि हिंग घालून मग त्यात टोमॅटोचे तूकडे घाला व परता.
१०) तेल वेगळे दिसू लागले कि त्यात ४ कप पाणी व मीठ घाला आणि उकळू द्या.
११) उकळी आल्यावर, त्यात एकेक गोळा सोडा. गॅस प्रखरच असू द्या. सर्व गोळे शिजून तरंगू लागले कि आणखी १ मिनिट उकळा
आणि गॅस बंद करा.
खाताना हे गोळे कुस्करुन घ्या. हा प्रकार चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता.