Ingredients

Directions
क्रमवार पाककृती :१) यासाठी आपल्याला एक स्वच्छ काचेचा जार (१ लिटर् )लागणार आहे. तो गरम पाण्याने धुवून कोरडा करून ( शक्य असल्यास उन्हात ठेवून ) घ्या. २) गाजरे किसून घ्या. बीटचे पातळ तूकडे करा. ( फक्त गाजराचा किस, अर्धा मिनिट उकळत्या पाण्यात घालून, लगेच निथळून घ्या. ) ३) ( मूळ कृतीत मोहरीची डाळ वापरतात, पण त्यापेक्षा ही कृती केल्यास जास्त चांगला स्वाद येतो.) मोहरी किंचीत गरम करून, ती लाटण्याने ठेचून घ्या. अगदी पूड करायची गरज नाही. ४) आता दिलेले सर्व साहित्य एकत्र करून ग्लास जार मधे भरा. ५) वरुन फिल्टर केलेले किंवा उकळून गार केलेले पाणी ओता.
६) या जारवर स्वच्छ कापडाचा दादरा बांधून तो घरातल्या उबदार जागी ठेवा. ७) कांजी तयार व्हायला ३ ते ५ दिवस लागतात. रोज एकदा सर्व मिश्रण स्वच्छ चमच्याने ढवळून घ्या. ८) दुसर्या दिवसानंतर पाण्याचा रंग गडद होत जातो आणि त्याला आंबूस वास यायला लागतो. तो येणे गरजेचे आहे पण वर बुरशी येता कामा नये.
९) ४थ्या किंवा ५व्या दिवशी ती गाळून फ्रीजमधे ठेवा. आता ती पिण्यासाठी तयार आहे. याच चवीनुसार आणखी तिखट, मीठ, हिंग घालू शकता.
ही कांजी फ्रीजमधे ८/१० दिवस टिकते. ( बाहेरही टिकते पण आंबट होत जाते. ) या कांजीत वडे घालून खायची पद्धत आहे. उडदाची डाळ भिजत घालून त्यात मीठ घालून त्याचे छोटे छोटे वडे, तूपात तळून घेतात आणि हे वडे गरम पाण्यातून काढून, पिळून या कांजीत बुडवून खाता. या कांजीत बुंदी पण घालतात.
या कांजीला नैसर्गिक आंबट चव येते, तरीही यात थोडे आमचूर किंवा आवळा ( ठेचून ) पण घालतात.
आता आम्ही पामरांनी काय ती स्तुती करावी !!! नेहमी प्रमाणेच खुप खुप सुंदर… हा पदार्थ माहिती नव्हता, नक्कीच करुन बघणार… उडिदच्या वड्यांसकट 🙂
LikeLike
धन्यवाद उषा 😊
LikeLike