Ingredients
लागणारे साहित्य : हे फळ कापल्यावर असे दिसते .
आणि या त्याच्या फोडी.
१) १ मोठ्या करमळीचे फळ’ २) १ टेबलस्पून तेल, ३) २ टिस्पून मोहरी, ४) १ टिस्पून हिंग, ५) १ टिस्पून हळद, ६) १ टेबलस्पून साखर, ७) २ टिस्पून मीठ, ८) लाल तिखट, चवीप्रमाणे.
Directions
क्रमवार पाककृती :
१) या फळाचे चार तूकडे करून, मधला बियांचा भाग काढून टाका.
२) उरलेल्या भागाचे मोठे तूकडे करून घ्या.
३) पाण्यात अर्धा टीस्पून मीठ घालून त्यात ते तूकडे मऊसर उकडून घ्या. (३ ते ४ मिनिटे )
४) पाणी टाकून द्या व या तूकड्यांच्या लहान फोडी करून घ्या.
५) या फोडींवर उरलेले मीठ आणि साखर घालून, मिसळून घ्या.
६) तेल कडकडीत गरम करून त्यात मोहरी टाका व गॅस बंद करा.
७) तेल थोडे थंड झाले कि त्यात हिंग, हळद व लाल तिखट घाला.
८) मग हे तेल त्या फोडींवर ओता आणि सर्व नीट मिसळून घ्या.
हे लोणचे टिकाऊ नाही, दोन तीन दिवसात संपवा.