Ingredients
लागणारे साहित्य :
१) १ जुडी आंबट चुका, २) अर्धी वाटी तुरीची डाळ, ३) पाव वाटी शेंगदाणे ( ऐच्छिक ), ४) २/३ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून, ५) १ टिस्पून जिरे, ६) अर्धा टिस्पून हळद, ७) अर्धा टिस्पून हिंग, ८) मीठ, ९) तेल.
Directions
क्रमवार पाककृती :
१) आंबट चुक्याच्या जुडीतील जाड देठ काढून टाका आणि पाने व कोवळे देठ चिरुन घ्या.
२) कूकरमधे थोडे तेल तापवून हिरव्या मिरच्या परतून घ्या.
३) त्यावर हळद व हिंग घालून आंबट चूका परतून घ्या.
४) मग त्यावर शेंगदाणे, डाळ घालून दोन वाट्या पाणी घाला.
५) कूकर बंद करुन, प्रेशर आल्यावर ५ मिनिटे डाळ शिजवून घ्या.
६) मग कूकर उघडून डाळ घोटून घ्या, व मीठ घाला.
७) थोड्या तेलाची जिरे घालून फोडणी करा व ती वरणावर ओता.
हे वरण आंबटच छान लागते, हवाच असेल तर त्यात थोडा गूळ वा साखर घाला.
