लागणारे जिन्नस असे : १) २ कप रवा, २) १/२ कप ओले खोबरे( बारिक खवणलेले, किंवा मिक्सरमधून काढलेल्रे. ) ३) १ कप सुकवलेली मिश्र फळे, ४) २ टेबलस्पून गुलाब पाकळ्या, ५) दीड कप साखर, ६) गुलाब पाकळ्या नसतील तर वेलची किंवा केशर ७) २ टेबलस्पून तूप क्रमवार पाककृती १) फळांचे मोठे तूकडे असतील, तर त्यांचे लहान लहान तूकडे करून घ्या. २) गुलाब पाकळ्या, थोडी साखर घालून मिक्सरमधून बारीक करून घ्या. ३) थोड्या तूपावर, मंद आचेवर रवा भाजून घ्या. ( रव्याचा रंग बदलू देऊ नका.) त्यातच ओले खोबरे घाला व परत मिश्रण हाताला हलके लागेपर्यंत परता. ४) रवा बाहेर काढून त्यात फळांचे तूकडे आणि गुलाबपाकळ्या मिसळून घ्या. ५) साखरेत पाव कप पाणी घालून मंद आचेवर ठेवा. त्यातच वापरत असाल तर, वेलची पावडर किंवा केशर घाला. ६) साखर विरघळून एक कढ आला कि त्यात रव्याचे मिश्रण घालून भराभर हलवा. आणि गॅसवरुन उतरवुन ठेवा. ७) थोडा वेळ मिश्रण मुरु द्या आणि मग हाताला तूप लावून लाडू वळायला घ्या. मिश्रण फार कोरडे वाटले तर त्यावर थोडे गरम दूध शिंपडा. हे लाडू मऊसर व्हायला हवेत. Ingredients
Directions
फारच सुंदर दिसत आहेत लाडू! पण सुकविलेली फळं कुठे मिळतील अशी?
LikeLike
Hi Vishakha,
You can get them in any dry fruits or even grocery shop. They are available as a mixture as seen in the photograph.
LikeLike