लागणारे साहित्य : १) ३ ते ४ पांढरे मूळे २) १/२ कप तूरीची डाळ, ३) २/३ हिरव्या मिरच्या, ४) २/३ लाल मिरच्या, ५) ६/७ लसूण पाकळ्या, ६) १ टिस्पून हळद, ७) १ टिस्पून हिंग, ८) १ टिस्पून मोहरी, ९) ३ टेबलस्पून तेल, १०) मीठ. क्रमवार पाककृती : १) तुरीची डाळ धुवून थोड्या पाण्यात भिजत ठेवा व त्यातच हळद आणि हिंग घाला. २) मुळ्याच्या पानाचे जून देठ काढून टाका आणि पाने व कोवळे देठ बारीक चिरून घ्या. ३) मूळा पण बरीक चिरा आणि वेगळा ठेवा. ४) हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या आणि लसूण यांचे तु़कडे करून घ्या. ५) प्रेशर कूकरमधे तेल तापवून त्यात हिरव्य मिरच्या परता आणि वर मूळ्याचा पाला परता. ६) पाला नीट परतून कोरडा झाला कि त्यावर मूळा आणि भिजवलेली डाळ घाला. मीठ घाला. ७) एक उकळी आली कि ढवळून, कूकरचे झाकण लावा आणि प्रेशर आले कि पाच मिनिटे शिजवा. ८) कूकर थंड झाला कि पाला थोडासा ठेचून घ्या. ९) उरलेले तेल तापवून त्यात मोहरी, लाल मिरची आणि लसूण घाला आणि ही फोडणी भाजीवर घाला. हि भाजी चपाती आणि भात, दोन्ही सोबत छान लागते. Ingredients
Directions