कोवळ्या फणसाची भाजी

 

 

Ingredients

 

 लागणारे जिन्नस :

१) १  किलो कोवळा फणस ( कुयरी ) ,

faasachee bhajee (1)

२) पाव कप काजू,

३) पाव कप शेंगदाणे,

४) पाव कप सुक्या खोबर्‍याचा किस,

५) दोन मोठे कांदे,

६) आठ / दहा लसूण पाकळ्या,

७) दोन हिरव्या मिरच्या,

८)  २/३ लाल मिरच्या,

९) २ टेबलस्पून तेल,

१०) १ टीस्पून  जिरे,

११) अर्धा कप दही,

१२) १ टिस्पून साखर,

१३) चवीप्रमाणे मीठ,

१४) उपलब्ध असल्यास २/३ सांडगी मिरच्या,

१५) १ टिस्पून काळा मसाला किंवा अर्धा टीस्पून गरम मसाला.

Directions

क्रमवार पाककृती

 

१) फणस न कापता ( अख्खा ) प्रेशर कूकरमधे १२ ते १५ मिनिटे शिजवून घ्या आणि तो पुर्ण थंड होवू द्या.

२) मग त्या फणसाचे १ इंच रुंदीचे काप करा.

३)आणि त्या प्रत्येक कापाचे २ भाग करा.

४) धारदार सुरीने काटेरी  साल आणि मधला दांडा कापून टाका. ( फणस उकडल्याने, हे फारच सोपे जाते.)

५) आता फणसाचे तूकडे हाताने बारीक कुस्करा.

faasachee bhajee (2)

६) कांदे बारीक कापून घ्या.

७) लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या आणि लसूण एकत्र भरड वाटून  घ्या.

८)   १ टीस्पून तेल तापवून त्यात  शेंगदाणे भाजून घ्या आणि त्यातच सुके खोबरे गुलाबी रंगावर भाजून घ्या, हे

दोन्ही बाहेर काढा.

९) आणखी थोडे तेल तापवून त्यात काजूगर आणि वापरत असाल तर सांडगी मिरच्या परतून घ्या, आणि बाहेर काढा.

१०) आता उरलेले तेल त्यात घालून जिरे भाजून घ्या.

११) त्यावर मिरचीचे वाटण घालून परतून घ्या.

१२) त्यावर कांदा घालून, सोनेरी रंगावर परता.

१३) मग त्यात दोन कप पाणी घाला व उकळू द्या, त्यात मीठ घाला.

१४)  त्यात  काळा मसाला किंवा गरम मसाला घाला.

१५) मग त्यात कुस्करलेला फणस घाला व ढवळा आणि झाकण ठेवा.

१६) तेलात परतलेले शेंगदाणे आणि सुके खोबरे भरड वाटून घ्या. दही आणि साखर नीट मिसळून घ्या.

१७) फणसाला चांगली वाफ आली कि हे दाणे खोबर्‍याचे भरड, दही त्यात घाला आणि नीट मिसळून गॅस बंद करा.

१८) खाताना वरुन तळलेले काजूगर आणि  तळलेल्या सांडगी मिरच्या कुस्करून घ्या.

( सांडगी मिरच्या मिळाल्या नाहीत तर लाल मिरच्या वापरू शकता. )

 faasachee bhajee (3)

ही भाजी भाकरी, चपाती बरोबर किंवा नुसती खायलाही छान लागते.

 

 

 

2 thoughts on “कोवळ्या फणसाची भाजी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s