लागणारे जिन्नस : १ ) अर्धा किलो चक्का ( घरी केलेला ), २ ) पाव किलो साखर, ३) चिमूटभर लिंबूफूल, ४) वेलची, सुका मेवा वगैरे, आवडीनुसार. क्रमवार पाककृती – १ ) एक किलो दही आणून ते जाड कपड्यात बांधून, टांगून ठेवा. रात्रभर ठेवले पाहिजे. – २ ) मग ते एका भांड्यात काढून फ्रीजमधे ठेवून गार करून घ्या. – ३) साखरेत एक चमचा पाणी घालून पाक करत ठेवा. – ४) साखर विरघळली कि त्यात वेलची व सुका मेवा घाला आणि परत उकळी आली कि आचेवरून खाली उतरा. – ५ ) पाक थोडा थंड झाला कि त्यात चक्का मिसळा आणि नीट घोटून घ्या, व परत थंड करत ठेवा. – ६ ) थोड्या वेळाने श्रीखंड घट्ट होईल, मग त्यावर गुलाबाच्या पाकळ्या वगैरे घालून खा.
Ingredients
Directions