लागणारे जिन्नस असे : १) अर्धा किलो वांगी, २) दोन मध्यम कांदे, ३) ३ ते ४ हिरव्या मिरच्या, ४) अर्धा कप दही, ५) पाव कप चिरलेली कोथिंबीर, ६) १ टेबलस्पून तेल, ७) १ टीस्पून मोहरी, ८) अर्धा टीस्पून हिंग, ९) मीठ, १०) पाव कप दाण्याचे कूट ( ऐच्छिक ). क्रमवार पाककृती १) वांग्याला तेलाचा हात लावून त्याला चारी बाजूने सुरीने किंचीत चिरा द्या. २) थेट गॅसवर किंवा जाळी वापरून ती चारी बाजुने नीट भाजून घ्या. निखार्यावर भाजली तर फारच छान. ३) एका ताटात भाजलेली वांगी ठेवून ती झाका आणि ताट कलते ठेवा, म्हणजे त्यातला काळा राप निघून जाईल. ४) नंतर त्याची साल काढून टाका आणि ते उघडून तपासून पहा. ५) कांदा व मिरची बारीक कापून घ्या. ६) तेल तापवून त्यात मोहरी आणि हिंग टाका. ७) गॅस बंद करून त्यात कांदा घाला आणि थोड्या वेळाने मिरची घाला. ( हे दोन्ही कच्चटच ठेवायचे आहेत.) ८) मग त्यात वांगे बारीक कुस्करुन टाका, मीठ दाण्याचे कूट ( वापरत असाल तर ) आणि कोथिंबीर घाला. ९) पुर्ण थंड झाल्यावर त्यात दही मिसळा. Ingredients
Directions