Ingredients
लागणारे जिन्नस असे१) २५० ग्रॅम कंटोळी,
२) १ मोठा कांदा,
३) १ टेबलस्पून तेल,
४) अर्धा टिस्पून हळद,
५) अर्धा टीस्पून हिंग,
६) १ ते २ टीस्पून लाल तिखट,
७) मीठ.
Directions
क्रमवार पाक़कृती
१) वर लिहिल्याप्रमाणे कंटोळी चिरुन घ्या.
२) कांदा पण बारीक चिरून घ्या.
३) तेल तापवून त्यात हिंग व हळद घाला.
४) त्यात कांदा घालून थोडा मऊ होऊ द्या.
५) मग त्यात कंटोळी घालून परता आणि झाकण ठेवून कंटोळी शिजू द्या.
६) मग त्यात तिखट व मीठ घालून परत थोडा वेळ परता.
काही जणांना ही भाजी परतून अगदी कोरडी केलेली आवडते, त्यामूळे तशी आवडत असेल,
तर परतून कोरडी करा.