तोंडलीची ठेचून भाजी

 

 

Ingredients

लागणारे साहित्य असे

 

 – १) २५०  ग्रॅम्स तोंडली,

 – २) १२ ते १५ लसूण पाकळ्या,

 – ३) ४ ते ५ लाल सुक्या मिरच्या,

 – ४) किसलेले सुके खोबरे, अर्धी वाटी,

 – ५) मीठ,

 – ६) १  टीस्पून जिरे,

 – ७) अर्धा टीस्पून हिंग,

 – ८) २ टेबलस्पून तेल,

  – ९) मूठभर काजूगर, ऐच्छीक. 

Directions

क्रमवार पाककृती

 

१) या भाजीतली सर्वात महत्वाची कृती म्हणजे तोंडली  ठेचून घेणे. त्यासाठी  एके तोंडले घेऊन ते

वरवंटा किंवा कुठल्या तरी जड वस्तूने  ठेचून घ्या. तोंडली ठेचणे थोडे  कौशल्याचे काम आहे. ठेचताना ती  इकडे तिकडे उडणार नाहीत आणि बोटांना ईजा होणार नाही, याची काळजी घ्या, त्यासाठी  तोंडली एका जाड कापडावर ठेवून ठेचा.

 

२) लसणाच्या पाकळ्या पण अश्याच  ठेचून घ्या.  लाल  मिरच्यांचे तूकडे करुन घ्या.

 

३) तेल तापवून त्यात हिंग व जिरे घाला, मग त्यात लाल मिरच्या आणि लसूण परतून घ्या. ( काजू वापरत असाल तर ते घाला.)

 

४) मग त्यावर  ठेचलेली तोंडली घालून २ मिनिटे परता.

 

५) झाकण  ठेवून मंद आचेवर तोंडली शिजू द्या, याला ७ ते ८ मिनिटे लागतील.   खाली लागतात असे दिसले तर पाण्याचा हबका मारा,

पण शक्यतो तोंडली वाफेवरच शिजू द्या.

 

६) मग त्यात मीठ व खोबरे घालून भाजी परतून कोरडी करा.

 

 

 

3 thoughts on “तोंडलीची ठेचून भाजी

 1. दिनेशदा, आम्हा सारस्वतांकडे ठेचलेल्या तोंडल्यांची अशीच भाजी केली जाते-तोंडल्याची तळासणी,ती सहसा खोबरेल तेलात केली जाते फरक एवढाच की त्यात काजू,खोबरं नसतं फोडणीत सालासकट ठेचलेला भरपूर लसूण,हळद व लाल तिखट/लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे एवढंच,लाल तिखटाने चव जास्त चांगली येते असं मला वाटतं फक्त ते जळू देऊ नये वर पाण्याचं झाकण,अधूनमधून परतावं मंदाग्नीवर,लसूण व तोंडली छान खरपूस होतात.काजू घालूनही भाजी केली जाते-उपकरी.मोहरी, उडीद डाळ,सुक्या मिरच्या,कढीपत्ता,हिंग फोडणी,थोडं पाणी घालून शिजवून गूळ, मीठ,ओलं खोबरं.तुमची रेसिपी मला आवडली नक्की करून बघेन तोंडली माझी आवडती भाजी आहे.

  Like

  1. Thanks Supriya,
   My mother learned this technique from her friend from Karwar. They taste great this way.
   You are free to share your recipes on my blog, You can write them yourself or I can cook them and publish them here with due credit to you.

   Dinesh

   Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s