१) ६ ते ७ आंबाडे, २) एक वाटी ओले खोबरे ३) ४ लाल मिरच्या किंवा ४ हिरव्या मिरच्या ४) १ टीस्पून धणे ( लाल मिरच्या घेतल्या तर ) किंवा १ टिस्पून जिरे ( हिरव्या मिरच्या घेतल्या तर ) ५) ४ कढीपत्त्याची पाने, ६) अर्धा टिस्पून तांदूळ, ७) २ टीस्पून तेल, ८) अर्धा टीस्पून मोहरी, ९) अर्धा टीस्पून हिंग व अर्धा टिस्पून हळद, १०) चवीप्रमाणे मीठ, ११) आवडीप्रमाणे साखर. क्रमवार पाककृती १) आंबाड्याची साले पीलरने काढून टाकावीत. २) धणे किंवा जिरे थोडेसे भाजून घ्यावे. ३) ओले खोबरे, लाल किंवा हिरव्या मिरच्या, धणे किंवा जिरे आणि तांदूळ एकत्र करुन अगदी बारीक वाटावे. ४) तेल गरम करून त्यात मोहरी घालावी, ती तडतडली कि हिंग, हळद आणि कढीपत्ता घालावा. ५) मग त्यात आंबाडे घालावे व थोडे परतून त्यात दोन कप पाणी घालावे. ६) झाकण ठेवून आंबाडे शिजू द्यावेत, २/३ मिनिटात ते शिजतात. ७) मग त्यावर वाटण आणि वाटणाचे पाणी घालावे. ८) चवीप्रमाणे मीठ व साखर घालावी आणि एक दोन उकळ्या आणाव्यात. हे रायते भात किंवा चपातीसोबतही छान लागते. Ingredients
लागणारे जिन्नस :
Directions