पालक मकई

 

Ingredients

  लागणारे जिन्नस असे

  Palak makaee palak

 • १) १ जुडी / ५०० ग्रॅम पालक,
 • २) १ कप स्वीट कॉर्न,
 • ३) १ मध्यम कांदा, ऊभा कापून,
 • ४) १ मध्यम बटाटा, चौकोनी तुकडे करून,
 • ५) ३ ते ४ हिरव्या मिरच्या,
 • ६) २ लाल मिरच्या,
 • ७) १ कप सायीसकट दूध,
 • ८) २ टेबलस्पून तेल,
 • ९) २ टेबलस्पून बटर,
 • १०) अर्धा टिस्पून दालचिनी पावडर,
 • ११) चवीनुसार मीठ.
 •  

  Palak makaee sahitya

Directions

  क्रमवार पाककृती :-

   

 • १) पॅन मधे एक टेबलस्पून बटर गरम करून त्यात हिरव्या मिरच्या कापून घाला आणि त्यावर ओबडधोबड कापलेला पालक घाला.
 • २) झाकण न ठेवता पालक परता आणि त्याचा रंग बदलल्यावर लगेच बाहेर काढा.
 •  

 • ३) एका कढईत तेल व उरलेले बटर तापवा, व त्यात लाल मिरच्या परतून बाहेर काढा.
 •  

 • ४) मग त्यात उभा कापलेला कांदा टाका आणि सोनेरी रंगावर परतून घ्या, बाहेर काढा.
 •  

 • ५) त्यात बटाट्याचे तूकडे घाला आणि सोनेरी रंगावर परतून घ्या, बाहेर काढा.
 •  

 • ६) आता त्यात स्वीट कॉर्न घाला.
 •  

 • ७) शिजलेला पालक, अर्धा तळलेला कांदा, बटाट्याचे तूकडे व दूध असे सगळे, मिक्सरमधे बारीक वाटून घ्या.
 •  

 • ८) हे सगळे कॉर्नमधे मिसळा आणि मंद आचेवर ५ मिनिटे उकळू द्या, अधून मधून ढवळा, मीठ आणि दालचिनी पावडर घाला.
 •  

 • ९) वरुन उरलेला कांदा आणि लाल मिरच्या पसरून, कुठल्याही रोटी सोबत खा.

Palak makaee close up

 

3 thoughts on “पालक मकई

 1. हे फक्त हॉटेल मध्ये खाल्ले आहे. कृती माहितीच नव्हती. पाकृ साठी धन्यवाद!!

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s