कोबीचे भानवले किंवा भानोले

 

Ingredients


लागणारे साहित्य असे :

 

 • १) अर्धा किलो हिरवा कोबी अगदी बारिक चिरुन,
 • २) चवीप्रमाणे मीठ ,
 • 3) चवीप्रमाणे तिखट,
 • ४) एक टिस्पून हळद,
 • 5) एक टिस्पून हिंग,
 • ६) एक टेबलस्पून आले, हिरवी मिरची यांचे वाटण (वाटणात हवे तर लसूणही घ्या.)
 • ७) एक टेबलस्पून धणे जिरे पूड (ताजी केली तर उत्तम, त्यात थोडी बडीशेप पण घ्या.)
 • ८) एक टिस्पून साखर,
 • ९) अर्धा कप नारळाचे दूध + अर्धा टिस्पून चिंचेचा कोळ (किंवा या दोन्हीच्या ऐवजी अर्धा कप आंबट ताक.),
 • १०) दोन टेबलस्पून तांदळाचे पिठ,
 • ११) एक ते दिड कप बेसन,
 • १२) दोन टेबलस्पून तेल,
 • १३) फ़ोडणी करायची असेल तर थोडे तीळ, ओवा, हिरवी मिरची वगैरे.

 

Directions

  क्रमवार पाककृती:

 • १) एका मोठ्या वाडग्यात कोबी पासून तांदळाच्या पिठापर्यंत सगळे घटक एकत्र करा.
 • २) हाताने ते सगळे एकत्र करत थोडेसे मळा.
 • ३) मग त्यात बेसन घाला. सगळे एकदम घालू नका.
 •  

  kobeeche bhanole mixture

 • ४) आता थोडे थोडे पाणी घालत सगळे एकत्र करा. थालिपिठाचे पिठ जसे भिजवतो तितपत      सैल असू द्या. त्यात तेल टाका व नीट मिसळून १५/२० मिनिटे तसेच झाकून ठेवा.      चव घेऊन बघा. तूम्हाला जेवढे तिखट आवडते त्यापेक्षा जरा जास्त तिखट करा, कारण    शिजवल्यावर ते थोडे सौम्य होते.
 • ५) भानोले शिजवायच्या दोन पद्धति आहेत. ते वाफ़वू शकता किंवा भाजू शकता. मला भाजलेले      जास्त आवडते.
 • ६) वाफ़वायचे असेल तर कूकरच्या डब्याला तेलाचा पुसट हात लावून त्यावर हे मिश्रण ओता.      डबा आपटून ते समपातळीत करा. प्रेशर न ठेवता साधारण अर्धा तास वाफ़वा. किंवा डब्याला      घट्ट झाकण लावून ८ मिनिटे प्रेशरकूक करा. कधी कधी कूकरचे तंत्र बिघडले असेल      तर डब्यात पाणी जाते. त्यामूळे प्रेशर न ठेवता वाफ़वण्याच्या पर्याय सेफ़ आहे.      आत खुपसलेली टूथपिक स्वच्छ निघाली कि शिजले असे समजा. मग पुरते थंड झाल्यावर      चौरस तूकडे करा. हे तूकडे तसेच खाता येतात पण गरज वाटलीच तर तेलाची तीळ, ओवा      हिंग घालून फ़ोडणी करा आणि त्यात हे तूकडे परतून घ्या. मी सल्ला देणार नाही पण      हवेच असतील तर हे तूकडे शॅलो फ़्राय पण करता येतील.
 • किंवा

  • ६) भानोले भाजण्यासाठी नॉन-स्टिक पॅनला तेलाचा पुसट हात लावून घ्या आणि हे मिश्रण त्यात ओता. आधी झाकण ठेवून आणि मग झाकण काढून एकदंर अर्धा तास अगदी मंद आचेवर भाजा. आत खुपसलेली टूथपिक स्वच्छ निघाली कि शिजले असे समजा. तशी गरज नाही पण वाटलेच तर दुस-या पॅनमधे उलटे करुनही भाजा. मग वड्या कापा.

   

kobeeche bhanole baked

 

2 thoughts on “कोबीचे भानवले किंवा भानोले

 1. Wow Dineshda this recipe of yours is my fav 🙂 Have cooked it few times before, will do the it this week too! My parents love it.

  Like

Leave a Reply to Sulakshana Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s