Ingredients
१) १ वाटी साधे काजू ( साधे म्हणजे, न खारवलेले )२) १ टेबलस्पून तांदूळ
३) १ टेबलस्पून ओले खोबरे ( पांढरे असावे, म्हणजेच पाठ घेऊ नये )
४) चवीप्रमाणे साखर
५) वासासाठी वेलची / केशर वगैरे
६) १ टिस्पून चायना ग्रास म्हणजेच अगर अगर ( ऐच्छिक.. टिप पहा )
७) थोडेसे तूप
Directions
क्रमवार पाककृती
१) काजू आणि तांदूळ, २ तास पाण्यात भिजत घालावेत मग निथळून घ्यावेत.
२) काजू, तांदूळ आणि खोबरे एकत्र करून अगदी बारीक वाटावे. वापरत असाल तर चायना ग्रासही त्यातच वाटावे.
वाटताना अगदी जरुरीपुरतेच पाणी वापरावे.
३) त्यात साखर मिसळून घ्यावी.
४) आता यात जरुर असेल तर थोडे पाणी मिसळावे. मिश्रण भज्यासाठी बेसन भिजवतो तितपत पातळ हवे.
( चायना ग्रास वापरले नसेल, तर मात्र ते त्यापेक्षा थोडे घट्ट ठेवावे लागेल ) या मिश्रणातच वेलची / केशर वगैरे मिसळून घ्यावे.
४) एका घट्ट झाकण असलेल्या डब्याला आतून थोडा तूपाचा हात लावून घ्यावा.
मी यासाठी एक खास पुडींगचे भांडे वापरलेय. या भांड्याचे झाकण क्लिप्स च्या सहाय्याने घट्ट बसते. त्याला रबर लायनींग नसते. पण त्याच्या खास डीझाईनमूळे आत पाणी जात नाही.
५) एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात खाली जाळी ठेवून किंवा कूकरमधे शिट्टी न लावता हे मिश्रण २० मिनिटे वाफवून घ्यावे.
६) भांडे पुर्ण थंड झाले कि याच्या वड्या किंवा तूकडे कापावेत.
मिश्रण अगदी बारीक वाटणे गरजेचे आहे.
चायना ग्रास किंवा अगर अगर याच नावाने बाजारात मिळते. फोटोत दिसताहेत तसे त्याचे धागे असतात. एरवी ते कात्रीने कापून बारीक करून घ्यावे लागतात ( याची पावडरही मिळते ) या कृतीत मात्र ते कापायची गरज नाही.
हे समुद्री वनस्पतीपासून मिळवतात आणि शाकाहारी आहे. पण याला जिलेटीन म्हणणे चूक आहे.
जिलेटीन प्राण्यांच्या हाडापासून मिळवतात आणि माझ्या कल्पनेप्रमाणे ते सध्या भारतात वापरात नाही.
चायना ग्रास वापरून मिल्क पुडींग, खरवस, जेली वगैरे प्रकार करता येतात. याला स्वतःची चव, वास वा रंग नसतो.
खूप खूप आभार! ही रेसिपी म्हणजे अप्रतिम आहे! दिसायला छान आणि चवीलाही. दंडवत!
LikeLike