सुदानी वांगी

 

Ingredients

  लागणारे जिन्नस
 • १) भरताची काळी वांगी, अर्धा किलो ( चमकदार रंगाची, आकाराने मोठी बघून घ्या.)
 • २) दोन मोठे कांदे, बारीक चिरून,
 • ३) दोन मोठे लाल टोमॅटो, बारीक चिरून ( किंवा एल टिन चॉप्ड टोमॅटो ),
 • ४) १ कप तेल ( या पदार्थाला एवढे तेल लागते.)
 • ५) १ टिस्पून लाल तिखट,
 • ६) १ टीस्पून हळद,
 • ७) चवीनुसार मीठ,
 • ८) २ टेबलस्पून व्हीनीगर,
 • ९) १ टिस्पून साखर,
 • १०) अर्धा कप कोथिंबीर,
 • ११) ६/७ हिरव्या मिरच्या, ( आवडीनुसार कमी जास्त )
 •  

  sudani brinjal sahitya

Directions

   

   

  क्रमवार पाककृती

 • १) वांग्याची साले काढून त्याच्या १ सेमी जाडीच्या चकत्या करुन घ्या.
 • ( बहुतेक मेडीटरेनियन डिशेस मधे वांग्याना मीठ लावून अर्धा तास ठेवून पाणी काढून टाकायला सुचवलेले असते, इथे ते आवश्यक नाही, पण तूम्हाला हवं तर तसे करु शकता.)

   

 • २) एका पॅनमधे तेल घालून ते मंचाआचेवर ठेवा व त्यात या चकत्या पसरून ठेवा. एका बाजूने सोनेरी झाल्या कि परतून घ्या. या चकत्या भरपूर तेल पितात त्यामूळे जसे जसे तेल लागेल तसतसे घालात रहा. हे तूम्हाला दोन तीन बॅचेस मधे करावे लागेल. चकत्या जसजश्या तळून होतील तसतश्या एका डिश मधे काढून घ्या. या बाहेर काढलेल्या चकत्या, उलाथन्याने मॅश करत रहा. त्या बरेच तेल सोडतील. हे तेल बाकीच्या चकत्या तळण्यासाठी परत पॅन मधे घालू शकता.
 • sudani brinjal fried slices

 • ३) अशा सर्व चकत्या तळून झाल्या कि पॅनमधे कांदा घाला आणि परतत रहा.
 •  

 • ४) कांदा गुलाबी झाला कि त्यात टोमॅटो घाला आणि आच मोठी करून टोमॅटो शिजवून घ्या.
 •  

 • ५) मग त्यात हळद आणि तिखट घाला आणि नीट मिसळा.
 •  

 • ६) मग त्यात मॅश केलेल्या वांग्याच्या चकत्या घाला आणि नीट मिसळा.
 •  

 • ७) त्यात मीठ आणि व्हीनीगर घाला, व ते गरम झाले कि साखर घाला.
 •  

 • ८) आता मंद आचेवर, झाकण न ठेवता, अधून मधून ढवळत हे मिश्रण, कडेने तेल दिसेपर्यंत शिजवा ( ५ ते १० मिनिटे )
 •  

 • ९) आच बंद करून मिश्रण पुर्ण थंड होऊ द्या. मग त्यात बारीक कापलेली मिरची आणि कोथिंबीर घाला.
 •  

  हा प्रकार जरा मुरल्यावर म्हणजे दुसर्‍या दिवशी जास्त छान लागतो. फ्रीजमधे ४/५ दिवस सहज टिकतो. पिटा ब्रेड सोबत छान लागतो.

  व्हीनीगर आणि साखर वापरल्याशिवाय योग्य ती चव येत नाही. तेल वाचवण्यासाठी मी वांगी ग्रील करुन

  बघितली, पण आवश्यक ती चव आली नाही.

sudani brinjals close up

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s