नागपुरी वडाभात

 

Ingredients

  लागणारे साहित्य असे :

   

 • १) दोन कप तांदुळ,
 •  

 • २) १ कप भिजवलेली मटकी,
 • ३) १/२ कप चणाडाळ, उडीद डाळ, मूग डाळ यांचे मिश्रण,
 •  

 • ४) ७/८ लसूण पाकळ्या,
 •  

 • ५) ३/४ हिरव्या मिरच्या,
 • vade bhat sahitya

 • ६) १ टिस्पून जिरे,
 •  

 • ७) अर्धा कप कोथिंबीर,
 •  

 • ८) चवीप्रमाणे मीठ,
 •  

 • ९) १ टीस्पून राई,
 •  

 • १०) १ टीस्पून तीळ,
 •  

 • ११) ४/५ सुक्या मिरच्या,
 •  

 • १२) १/२ टिस्पून हिंग,
 •  

 • १३) तेल

Directions

  क्रमवार पाककृती

   

 • १) चणाडाळ आणि इतर डाळी व जिरे कोरडेच भाजून घ्या. ( हा मी केलेला बदल आहे. )
 •  

 • २) मग या डाळी कोरड्याच भरड वाटून घ्या,
 •  

 • ३) भिजवलेली मटकी, हिरव्या मिरच्या आणि लसूण जाडसर वाटून घ्या,
 •  

 • ४) आता ही दोन्ही मिश्रणे नीट मिसळून घ्या, मीठ घाला.
 •  

 • ५) या मिश्रणाचे आपल्याला वडे करायचे आहेत, त्यासाठी एका पसरट कढईत तेल तापत ठेवा, व आच मध्यम ठेवा.
 •  

 • ६) वडे करण्यासाठी मी एका बाटलीचे गोल झाकण वापरले आहे, त्याने वडे सुबक सारख्या आकाराचे होतात. तेलात सोडण्यापुर्वी त्या वड्याना मधोमध एक भोक पाडा.
 • vadebhat shapes

 • ७) वडे लालसर रंगावर तळून घ्या.
 •  

 • ८ ) दरम्यान तांदूळ धुवून त्याचा भात करून घ्या. मूळ कृतीत साधा पांढराच भात करतात. मी तो करताना थोड्या तेलाची फोडणी करून त्यात हळद आणि कोथिंबीर परतली आहे. त्याने रंग छान आला.
 •  

 • ८) सर्व वडे तळून झाले कि त्याच तेलात मोहरी, हिंग आणि तीळ घाला आणि ते तडतडले कि सुक्या मिरच्यांचे तूकडे घालून खमंग फोडणी करा.
 •  

 • ९ ) प्लेटमधे भात घेऊन त्यावर काही वडे कुस्करून टाका आणि वर मिरचीचे तेल घ्या.
 •  

  हा भात चवीला अप्रतिम लागतो.

   

vadebhat close up1

 

4 thoughts on “नागपुरी वडाभात

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s