अरवी फ्राय

 

Ingredients

  लागणारे जिन्नस

   

 • १) पाव किलो असवी ( लांबट आकाराची, गाठी नसलेली बघून घ्या),
 • २) १ टेबलस्पून, बाजारी चिंचेचा कोळ,
 • ३) २ टिस्पून लाल तिखट,
 • ४) अर्धा टिस्पून हळद,
 • ५) अर्धा टिस्पून हिंग
 • ६) १ टीस्पून घणे जिरे पूड
 • ७) २ टेबलस्पून तांदळाचा रवा
 • ८) ३ ते ४ टेबलस्पून तेल
 • ९) वरुन घेण्यासाठी चाट मसाला किंवा मिरपूड
 • १०) मीठ
 •  

Directions

  क्रमवार पाककृती

   

 • १) अरवीची साले पीलरने काढून टाका, मग त्या धूवून कोरड्या करा.
 • २) प्रत्येक अरवीचे उभे दोन तूकडे करा आणि त्या तूकड्यांना खोलवर दोन तीन चिरा द्या.
 • ३) त्या तूकड्यांना फक्त चिंचेचा कोळ चोळून घ्या आणि दहा मिनिटे तसेच ठेवा.
 • ४) एका मोठ्या पसरट पॅन मधे तेल गरम करा आणि त्यात हे तूकडे पसरून ( सपाट बाजू खाली ) ठेवा.
 • ५) मंद आचेवर झाकण ठेवून हे तूकडे शिजू द्या.
 • ६) थोड्या वेळाने झाकण काढून ते परतून घ्या. टूथ पिक ने टोचून शिजले कि नाही ते बघा.
 • ७) हळद, तिखट, हिंग आणि धणे जिरे पूड कोरडीच एकत्र करा आणि हे मिश्रण अरवीवर पसरून टाका.
 • ८) अलगदपणे परतून, हा मसाला सर्व अरवीला लागेल असे पहा. ( गरज वाटली तर मीठ टाका. बाजारी चिंचेच्या कोळात मीठ असते, त्यामूळे त्या अंदाजाने मीठ घाला.)
 • ९) आता अरवीवर तांदळाचे पीठ किंवा रवा पसरून टाका, आणि परतून सर्व तुकड्यांना लागेल असे पहा.
 • १०) कोरडे आणि खरपूस होईपर्यंत परता. ( जर तेल दिसत असेल तर थोडे आणखी पीठ वा रवा टाका. )
 • Arvi fry close up

  वरुन चाट मसाला किंवा मिरपूड घ्या आणि आवडत्या चटणी सोबत खा.

   

   

 

 

3 thoughts on “अरवी फ्राय

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s