वडा पाव – एक पर्याय

 

Ingredients

  लागणारे साहित्य :

   

 • १) एक लांबट किंवा २ गोल पाव
 • २) अर्धा कप भावनगरी गाठ्या ( किंवा इतर कुठलेही फरसाण )
 • ३) २ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
 • ४) ४/५ लसूण पाकळ्या + अर्धा इंच आले + ३/४ हिरव्या मिरच्या एकत्र कूटून
 • ५) २ टिस्पून तेल
 • ६) १/२ टिस्पून हळद
 • ७) १/२ टिस्पून मोहरी
 • ८) चिमुटभर हिंग
 • ९) मीठ
 • १०) हिरवी चटणी ( ३ हिरव्या मिरच्या + अर्धा कप कोथिंबीर + मीठ + लिम्बू एकत्र वाटून )
 • ११) लसूण चटणी ( ५/६ लसूण पाकळ्या + अर्धा कप शेंगदाणे + १ टिस्पून लाल तिखट + मीठ एकत्र वाटून )
 •  

 • १२) या शिवाय आवडत असेल तर चिंचेची गोड चटणी.
 • Wada pav ing

  सर्व चटण्यांच्या ऐवजी तयार ग्रीन चिली सॉस, केचप घेता येईल.

Directions

क्रमवार कृती.

 

१) बटाटे सोलून त्याच्या फोडी करुन घ्या.

२) तेल तापवून त्यात मोहरी, हिंग व हळद घाला आणि त्यावर बटाट्याच्या फोडी घाला.

३) नीट परतून त्यात मीठ घाला व गॅस बंद करा.

४) पाव अर्धे कापून त्यातला मधला भाग काढून घ्या.

५) हे मधले तुकडे, तव्यावर गरम करुन कुरकुरीत करून घ्या.

६) हे तूकडे आणि भावनगरी गाठ्या, मिक्सरमधे कोरडेच, भरड वाटून घ्या.

७) बटाट्याच्या भाजीत आले लसूण आणि मिरचीचे वाटण घालून, ती थोडी कुस्करुन घ्या.

८) तूम्हाला आवडत असतील तर पावाचे तूकडे पण थोडे तेल लावून, तव्यावर कुरकुरीत करून घ्या.

Wada pav tayari

 

९) आता पावाच्या खळग्यात थोडे भावनगरी गाठ्यांचे मिश्रण घाला.

१०) त्यावर बटाट्याची भाजी घाला.

११) मग हवे तर हे तूकडे एकमेकंवर ठेवा.

१२) चटणी सोबत खा. ( हव्या तर चटण्या पावाच्या आतही घालू शकता. )

Wada pan close up

मी फक्त फोटोसाठी स्लाईस केल्या आहेत, तशी गरज नाही.  

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s