Ingredients
मी घेतलेले जिन्नस असे.
- १) २ कप मूगाची डाळ
- २) पाव कप उडदाची डाळ
- ३) पाव कप तांदळाचे पिठ
- ४) दोन कप आंबट ताक
- ५) मीठ
- ६) तेल
- ७) फोडणीचे साहित्य ( हिंग, मोहरी, जिरे व तीळ )
- ८) सजावटीसाठी बारीक चिरलेली मिरची, कोथिबीर, बारीक शेव ( मी आलू भुजिया वापरली ) लिंबू
Directions
क्रमवार पाककृती:
१) मूगाची डाळ व उडदाची डाळ कोरडीच मिक्सरमधे रवाळ वाटून घ्या.
२) हे मिश्रण आणि तांदळाचे पिठ, ताकामधे सरसरीत भिजवा ( थोडे पाणी वापरावे लागेल. डाळी भिजल्यावर ते थोडे घट्ट होते
३) असे भिजवून रात्रभर ठेवता आले तर ठिक नाहीतर २/४ तास भिजले तरी पुरे. मग त्यात मीठ घाला.
४) मग कूकरच्या डब्याला तेलाचा हात लावून त्यात हे मिश्रण, प्रेशर न लावता, २०/२५ मिनिटे वाफवून घ्या.
५) पुरते थंड झाले कि हाताने त्याचा कस्करून भगरा करा.
६) मग तेलाची हिंग, मोहरी व तीळ घालून खमंग फोडणी करा.
७) मग फोडणीत थोडेसे पाणी घाला.
८) हि फोडणी भगर्यावर पसरून ओता.
९) मग मिरची, कोथिंबीर आणि शेव वरून पसरा, लिंबू पिळा.
हा प्रकार खायला खुप चटकदार लागतो. हे मिश्रण आधी शिजवून ठेवले तरी चालते. खरे तर आधीच शिजवायला हवे म्हणजे त्याचा व्यवस्थित भगरा होतो.
माहितीचा स्रोत:
पारंपरीक पदार्थ चण्याची डाळ वापरून करतात, मी मूगाची वापरली, एवढेच
khup mast recipe da!!!!
LikeLike
Thank you !
LikeLike
sundar…. aata ratri dali bhijat ghalnar !!!
LikeLike
Mast recipe I will try it for sure
LikeLike
खुप छान
LikeLike