घुटं – एक मराठमोळा प्रकार

Ingredients

ghute.png

  • १) १ वाटी उडीद डाळ
  • २) अर्धा टिस्पून हळद
  • ३) चार पाच हिरव्या मिरच्या
  • ४) एक इंच आले
  • ५) चार पाच लसूण पाकळ्या
  • ६) मूठभर कोथिंबीर
  • ७ ) साजूक तूप एक टेबलस्पून
  • ८) एक टिस्पून जिरे
  • ९) अर्धा टिस्पून हिंग
  • १०) मीठ

 

Directions

१) उडदाची डाळ कोरडीच गुलाबी रंगावर भाजून घ्या.

२) त्यात पाणी घालून, अर्धा तास भिजत ठेवा.

३) त्यात हळद घालून, ती शिजवून घ्या. आवडीप्रमाणे कमी जास्त शिजवा, व जरा घोटून घ्या.

४) आले, लसूण, मिरच्या व कोथिंबीर वाटून घ्या.

५) तूप तापवून त्यात हिंग जिर्‍याची फोडणी करा.

६) त्यात मिरची कोथिंबीरीचे वाटण टाका व परता

७) मग त्यात शिजलेली डाळ व मीठ टाकून उकळा

 

बाजरीची भाकरी, घुटं, ठेचा आणि दही.. मस्त बेत जमतो. (मी मक्याची भाकरी केलीय.)

घुटं पातळसर करतात. मी फोटोसाठी घट्ट ठेवलेय.

 

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s