उम्म अलि / Umm Ali

For English version, please scroll down

Umm Ali

 

आपल्या डॉ. उज्ज्वला दळवी यांनी लिहिलेल्या, सोन्याच्या धुराचे ठसके या पुस्तकामधे मधे या खास सौदी अरेबियन रेसिपीचा उल्लेख आहे. मी मस्कतमधे खाल्ला होता हा प्रकार, पण नाव कुणी सांगितल्याचे आठवत नाही.

 

आता पहिली ठेच लागणार ती या नावालाच. अर्थातच हा अरेबिक शब्द आहे आणि त्याचा अर्थ अलिची आई ( उम्म = आई ) पण हा म्म इतका कठोर नसतो आणि अलिचा उच्चार मात्र थोडा घश्यातून करावा लागतो.

अहमद आणि अलि या दोन शब्दातले, “अ” वेगळे आहेत.

 

तर कुण्या अलि नावाच्या मुलासाठी त्याच्या आईने केलेला हा पदार्थ, तिच्याच नावाने ओळखला जातो.

चवीला अर्थातच भन्नाट लागतो.

 

या पदार्थाचे घटक आपल्या मनाप्रमाणे बदलू शकता, आणि आपापले व्हर्जन करु शकता. ( कोण जाणे,

हा पदार्थ तूमच्याही नावाने ओळखला जाईल. )

 

१) दोन टेबलस्पून बदाम / पिस्ते यांचे तुकडे ( बदाम / पिस्ते इराणमधे मुबलक पिकतात. अरब जगतात ते सढळ हस्ते वापरतात. काजू मात्र शक्यतो नसतात. )

२) दोन टेबलस्पून खजूर

३) १ टिस्पून तूप

४) अर्धा कप दूध

५) २ कप आटवलेले दूध किंवा २ टिन इव्हॅपोरेटेड मिल्क किंवा २ कप बासुंदी किंवा १ टिन मिल्कमेड + १ कप दूध

६) सुक्या खोबर्‍याचे पातळ तूकडे, १ टेबलस्पून

७) लागलीच तर साखर

८) पफ पेस्ट्री ( म्हणजे आपली खारी, पण बेसिक पफ पेस्ट्री खारी नसते ) ४ चौरस इंच किंवा १ एक मध्यम क्रोसैन्त ( कदाचित फ्रेंच उच्चार कृतां असा असेल, चंद्रकोरीच्या आकाराचा कुरकुरीत फ्लेकी पाव. या शब्दाचा

अर्थच चंद्रकोर असा आहे. ) किंवा आपल्या आवडीचे बिस्किट ( आकारानुसार १ ते २ )

१०) ऑरेंज ब्लॉसम वॉटर, एक टिस्पून ( हे संत्राच्या मोहोराचे पाणी असते. गुलाबपाण्यासारखे वापरतात. ते न

मिळाल्यास ताज्या संत्राच्या किसलेली साल १ टिस्पून ( फक्त केशरी भागच घ्या ) किंवा संत्राची पाकवलेली

साल. ( आपल्याकडे सुक्या मेव्याच्या दुकानात मिळते. ))

क्रमवार पाककृती :

१) फ्रोझन पफ पेस्ट्री वापरत असाल तर ती बेक करून कुस्करून घ्या. क्रोसैन्ट पण असेच जरा गरम करुन कुस्करून घ्या. बिस्कीट वापरत असाल तर तसेच कुस्करून घ्या.

२) तूपात खोबर्‍याचे तूकडे, बदाम पिस्ते जरा परतून घ्या. नंतर त्यावर खजूरही टाकून परता. पण खजूर फार परतू नका, कडू होतो.

३) मग त्यावर साधे दूध घालून सगळे एकजीव करा. त्यावर पेस्ट्री / कृतां / बिस्किटाचा चुरा घाला.

४) मग त्यावर आटवलेले दूध ( किंवा त्याचे पर्याय ) घाला. हवी तर साखर टाका. आणि ढवळा.

५) बोलमधे घालून वर ऑरेंज वॉटर वा त्याचे पर्याय टाका.

 

आणि चमचा चमचा भर खात रहा.. झोप लागेपर्यंत 🙂

 

घटक वेगळे आहेत खरे पण याची चव भन्नाट असते. हा प्रकार गरमच खायचा असतो.

मी सजावटीसाठी शेपूचे पान ठेवले आहे. गल्फ मधे ते फार आवडीने खातात.

 

Umm Ali

Umm Ali

 

 

This is a famous desert from Egypt and other surrounding countries. The name literally means, mother of Ali. She must have made this dish, for the hungry Ali. This is eaten warm.

The ingredients can be varied to suit individual taste. (Many of the recipes on internet, mention khari biscuits, as one of the ingredients. This is not true, the khari biscuits, as the name suggests are salty and for this dish, we need the unsalted puff pastry.)

The ingredients are –

1) 2 tablespoons chopped almonds or pistachio nuts (unsalted.)

2) 2 to 3 seedless dates, chopped

3) 1 teaspoon ghee (clarified butter)

4) Half cup milk

5) 2 cups reduced milk / 2 tins of evaporated milk / 1 tin condensed milk + 1 cup milk ( You need only one of the option )

6) Thin slices of dry coconut

7) Sugar, if at all needed

8) One sheet of puff pastry / one large croissant / few biscuits of choice

9) 1 teaspoon orange blossom water / 1 teaspoon orange zest / 1 teaspoon candied orange peel

 

To make umm Ali

 

1) If you are using puff pastry, you need to bake and crumble it. If you are using croissants, warm it

a little and crumble it. If you are using biscuits crush them, keep all these aside.

2) Heart the ghee and fry the coconut slices a little and then fry the dry fruits. Then add the dates (do not fry the dates.)

3) Add milk and mix well.

4) Then add the baked pastry or crushed croissants or crushed biscuits

5) Then add the reduced milk (or the suggested substitutes), Check and add sugar if needed.

6) Remove from fire, pour into individual bowls. Add orange blossom water (or suggested substitutes) and enjoy.

 

The ingredients are bit unusual but the final product is very tasty.

 

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s