For English version, please scroll down
आंब्याच्या दिवसात आपल्याकडे आमरसाचा बेत होतोच. आमरसासोबत आपल्याकडे सहसा पुर्या केल्या जातात.
( पण महाराष्ट्राची पारंपरा पुर्याची नसून, पिठपोळ्या किंवा गवसण्यांची आहे, असे दूर्गा भागवत यांनी लिहिलेले आहे) विदर्भात आमरसासोबत शेवयाही केल्या जातात.
पण आपल्याकडे पोहे भरपूर खायचा प्रघात असला तरी आमरसासोबत पोहे खाल्ले गेलेले मी कुठे बघितले नाहीत.
हा प्रकार मी माझ्या बिहारी मित्राकडे बघितला आणि मग तो अविनाश बिनीवाले यांच्या, न्याहारी या पुस्तकातही वाचला.
हा अगदीच साधा न्याहारीचा प्रकार आहे. आमरस काढून त्यात पोहे भिजवायचे आणि खायचे. अगदीच कुणी
अतिगोडखाऊ असेल तर यात थोडी साखर घालतात. मोठी माणसे कधी कधी बिहारी पद्धतीचे ( आंब्याचेच ) लोणचे
घेतात. ताजे पोहे असतील तर हा प्रकार खुप रुचकर लागतो. पण इथे मी त्याला थोडा तडका ( अक्षरशः) दिला
आहे.
आता थोडे आंब्याविषयी. आपल्याला आपल्या देवगड हापूसचा कितीही अभिमान असला तरी आंबा काही महाराष्ट्राची ,मक्तेदारी नाही. भारतातील बहुतेक राज्यात आंबा होतोच ( अपवाद पूर्वाचलातील राज्यांचा असावा,
तिथे आंब्याची झाडे आहेत, त्यांना आंबे लागतातही, पण ते पिकता पिकता सडून जातात. )
खास भारताची अशी एक आंब्याची जात असली तरी आंबा ही भारताचीही मक्तेदारी नाही. ट्रॉपिकल हवामान
असलेल्या बहुतेक देशात आंबे होतातच. इथे अंगोलातही ते होतात. साधारण १५ नोव्हेंबर पासून बाजारात
आंबे यायला लागतात, ते साधारण मार्च पर्यंत असतात.
हे आंबे बेताचे गोड असतात, त्यात भरपूर रस निघतो आणि थोड्याफार रेषाही असतात. ( बेताचा गोडवा आणि
फायबर असणे हे तर आदर्श फळाचे ल्क्षण आहे. मऊसर गर आणि अतिगोड असणारा हापुसचा आंबा, हे तर
मानवनिर्मित फळ आहे.
लागणारे जिन्नस असे :
१) पातळसर आमरस – २ वाट्या
२) पोहे – १ ते दिड वाटी
३) १ टिस्पून तूप
४) एखादी लाल मिरची ( किंवा थोडी मिरपूड )
५) अर्धा चमचा जिरे
क्रमवार पाककृती
१) तूपाची जिरे आणि मिरची घालून फोडणी करून त्यात कोरडे पोहे घाला.
२) मंद आचेवर ते परतून गुलाबी करून घ्या.
३) ते डीशमधे काढून घ्या, आणि थोडे निवले कि त्यात आमरस घाला.
आणि लगेच खायला घ्या.
अगदी वेगळ्याच चवीचा हा प्रकार खायला खुप रुचकर लागतो. तूम्हाला आमरसात मीठ लागत असेल,
तर या प्रकारातही थोडे मीठ घालू शकता. तसेच जिरे व मिरची आवडत नसेल तर वगळू शकता.
Mango pulp with puffed rice ( A breakfast dish from Bihar )
Mango pulp, ( aamaras ) is very popular all over India. There are various accompaniments which are made with aaamras. It could be puri, chapatti, a chapatti mad with stuffing of cooked rice flour, steamed noodles etc. I read in a book by Mr. Avinash Biniwale that in Bihar, the mango pulp is eaten with puffed rice ( Poha, chidwa ), hence I tried it.
Though I miss Alphonso mangoes of India, I am lucky enough to have tasted mangoes from many countries. In few countries like Sultanate of Oman, Nigeria, Kenya, Angola, I could pluck them myself from the trees.
Mangoes which are not from grafted trees have more fiber and less sugar, but they are still tasty.
I have used such a mango in this dish. In original version, the mango pulp is mixed with the puffed rice directly and eaten. I have roasted the puffed rice a little. This added some crush to the dish.
The ingredients are
1) 2 cups mango pulp ( diluted, if too thick )
2) 1 to 1 ½ cup puffed rice ( Poha, Chidwa )
3) 1 teaspoon ghee ( clarified butter )
4) 1 dry red chili or ½ teaspoon freshly ground pepper ( optional )
5) ½ teaspoon cumin seeds ( optional )
To Proceed..
1) Heat the butter in a pan and add the red chili ( broken into pieces ) and cumin seeds. ( If using.)
2) Lower the heat and add the puffed rice, and roast till it turns, pink and crispy.
3) Remove into a plate.
4) Mix with mango pulp and eat immediately.
You may add a pinch of salt, if you wish.