सब्स्टीट्यूट डोसा / Substitute Dosa

For English version, please scroll down

substitute dosa dish

 

 

असा मस्त कुरकुरीत डोसा, आतमधे भरलेली बटाट्याची भाजी, सोबत खोबर्‍याची चटणी आणि वाटीत सांबारही. एक प्लेट मसाला डोसा मागितला तर असा मस्त सरंजाम समोर येतो..

 

पण ते भारतात महाराजा. इथे अंगोलात कोण देणार मला आयता डोसा ? आले दिनेशच्या मना… असे म्हणूनही लगेच डोसा होत नाही. इये अंगोला नामे देशी, भारतीय वस्तू मिळण्याचे एकच दुकान आहे. तिथेही जायला मला सवड होत नाही. माझी भिस्त असते भारतातून जे सामान आणतो त्यावरच.

पण त्यात तरी काय काय आणणार ?

तर हा डोसा कसा जम(व)ला त्याची सुरस कथा..

 

१) खुद्द डोसा.

डोसा करण्यासाठी बासमती तांदूळ १ कप, त्यात १ टेबलस्पून उदीद डाळ, १ टेबलस्पून साबुदाणा आणि १ टिस्पून मेथी असे भिजत घातले. झोपायच्या आधी आठवणीने ते वाटून ठेवले.

एरवी असे वाटण सकाळी नीट आंबलेले असते. पण त्या दिवशी सूर्य स्विच ऑफ केल्यासारखी थंडी पडली. तशी इथे आता थंडी पडणारच होती, पण ती हळू हळू पडते. अशी एकदम नाही. बहुतेक इथल्या समुद्रात शीत प्रवाह आला असावा. तर तात्पर्य असे कि पिठ आले नाही. मग मी त्यात ब्रेड मेकिंग मशीन साठी लागते ती इंस्टंट यीस्ट टाकली. ती मात्र नावाला जागली आणि अर्ध्या तासातच पिठ मस्त फुगून आले. मग डोसे बनवायला काय ?

 

२) बटाट्याची भाजी

अंगोलाच्या पूर्व भागात बटाटे होतात. ( सफरचंदेही होतात ) पण त्यांच्या सिझन असला कि दुकानात दुसरे बटाटे नसतात. हे बटाटे नेहमीच चांगले निघतात असे नाही. म्हणून मी पोटॅटो फ्लेक्स नेहमी घरी ठेवतो. या भाजीसाठी पण तेच वापरले.

तेलाची हिग मोहरीची फोडणी करून त्यात हळद व मिरच्या परतल्या. मग कांदा परतला. त्यात पाणी ओतले आणि त्याला छान उकळी आल्यावर त्यात पोटॅटो फ्लेक्स टाकल्या. फोडणीत उडदाची डाळ टाकायची राहिली होती, म्हणून हाताशी नेहमी असणारे शेंगदाणेच टाकले. झाली भाजी तयार.

 

३) सांबार

सांबार मसाला मी नेहमी रुचिरातील प्रमाणानुसार घरून करून आणतो. तो संपला होता. इथेही केला असता पण कढीपत्ता मिळत नाही इथे. मग कूकरमधे त्याचे घटक म्हणजे धणेजिरे पूड, मिरपुड, हिंग, तिखट असे किंचीत भाजून घेतले. तुरीची डाळही भारतातूनच आणली आहे. ती पण जरा शेकून घेतली. मग त्यात पाणी ओतले व चिंचेचा कोळ, हळद टाकले. घरात ज्या भाज्या होत्या ( ब्रोकोली, गाजर, मश्रुम ) त्या सांबारात घालण्याजोग्या नव्हत्या. सुट्टी होती म्हणून घराजवळचे दुकानही उघडले नव्हते. तसेही तिथे टोमॅटॉ शिवाय दुसरी भाजी मिळालीच नसती. मग त्या सांबारात फक्त कांदा घातला. आणि शिजवून घेतले. वरुन फोडणी दिली.. बर्‍यापैकी चव जमली.

 

४) चटणी

एवढ्याश्या चटणीसाठी पण उद्योग करावा लागला बरं का ? इथून समुद्रकिनारा जवळ असला तरी नारळाची अजिबात लागाव्ड नाही. बाजारात कधी असले तर ते वट्ट साडेसातशे रुपये किलो दराने लावलेले असतात. आणि तेही खराब निघायची १०५ टक्के खात्री. नारळाचा किस मात्र मिळतो. तो छान स्वादाचा असतो. तोच कोमट पाण्यात भिजत घातला. त्यात थोडे टिनमधले कोकोनट क्रीम घातले. तव्यावर परतून चण्याची डाळ व मिरच्या घातल्या. आणि वाटले. चटणी पण जमली.

 

Substitute Dosa

substitute dosa close up 2 

 

 

Most of you would find this name strange. But it truly is. I do love masala dosa, and if in India, I can order in any of the cities and I will be served with a nice crispy dosa, filled with potato bhaji, accompanied with sambar and chutney.

Even if I want to make it at home, al the ingredients are easily available. Hey, but that is India. In a country of Africa, even basic ingredients may be difficult to find.

With all these limitations, I still managed to make a masala dosa… this is the story of that dosa. As I had to substitute so many ingredients, I call it substitute dosa.

 

1) For the dosa

I soaked 1 cup basmati rice ( yes, I know this is not the ideal choice for dosa, I do not have much choice here. ), 1 tablespoon udid dal, 1 tablespoon sago and 1 teaspoon methi (fenugreek seeds). I ground them in the night and kept for fermenting. And suddenly the night became cold. ( This happens on this side of the world. ) The batter did not ferment at all till morning.

I do keep the instant yeast for my bread making machine. I added 1 teaspoon of it to the batter and waited for 1 hour. The yeast did the magic and my batter was ready.

Making dosas with that batter was child’s play.

 

2) Potato bhaji

I always keep potato flakes at home as they are easily available here and moreover they are much more convenient to use.

I heated some oil and added mustard seeds, asafetida, turmeric and chilies. Then added finely chopped onion and after it turned pink, added water and salt. After the water started boiling, I added potato flakes and within minutes, my bhaji was ready. I had forgotten to fry udid dal in oil, hence I added some roasted groundnuts to my bhaji.

 

3) Sambar

I usually make my own sambar powder as it tastes better that store bought. I could have made it here in Africa also, but we do not get, curry leaves here.

In pressure cooker, I roasted dhana jeera powder, black pepper powder, asafetida and red chili powder.

I added toor dal to it and roasted it for 2 minutes, added water, turmeric and tamarind pulp. Pressure cooked it. I did not have any vegetable, that could be added to sambar, so I added just onion.

And the thing was quiet close to sambar in taste !

4) Chutney

 

Even making chutney was not without hurdles. Fresh coconuts are not easy to find here. I soaked the desiccated coconut in lukewarm water, and ground it with some green chilies, fried chana dal and salt.

Then added little coconut cream.

 

Then made a tamper with red chilies and mustard seeds for my sambar and chutney.

substitute dosa close up

 

 

One thought on “सब्स्टीट्यूट डोसा / Substitute Dosa

  1. Bapre…photo atishay tempting aahe…photo pahun jarashihi kalpana yet nahi ki yamage itake kabadkashta astil…Hats of to you….simply great..!!!

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s