मल्टीपर्पज मसाला / Multipurpose Masala

For English version, please scroll down

multipurpose masala balls.JPG

 

लागणारा वेळ:

३ तास

लागणारे जिन्नस:

मला स्वत:ला सुगंधी पण फ़ारसा तिखट नसलेला मसाला आवडतो. या आवडीतून गेल्या काही वर्षांपासून मी एक खास मसाला करुन ठेवतो. हा फ़्रिजमधे ठेवला तर वर्षभरदेखील सहज टिकतो. हा मसाला वापरुन अनेक पदार्थ करता येतात.

या मसाल्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. घटक पदार्थही बरेच आहेत. पण एकदा हा करुन ठेवला, कि आयत्यावेळी मात्र पदार्थ पटकन तयार होतो.

हा मसाला वापरल्यास तिखटा मिठाशिवाय बाकिचे मसाले वापरायची गरज नसते. तसेच या मसाल्याने ग्रेव्ही पण दाट होते. तर घटक पदार्थ असे. १) एक किलो कांदा, उभा पातळ चिरून. (हा कांदा आपल्याला तेलावर भाजून घ्यायचा आहे, आणि त्याला खुप वेळ लागतो. शक्य असेल तर असा कांदा कापून उन्हात वाळवून घेतला तर छान. मोठ्या शहरात वाळवलेला कांदा पण मिळतो.)
२) दिड वाटी बाजारी सुक्या खोब-याचा किस.
३) एक वाटी धणे
४) अर्धी वाटी जिरे
५) अर्धी वाटी तीळ
६) अर्धी वाटी खसखस
७) पाउण वाटी कच्ची बडीशेप.
८) दोन टेबलस्पून काळी मिरी
९) ६/७ मसाला वेलचीमधले फ़क्त दाणे
१०) दोन इंच दालचिनी
११) १०/१२ हिरव्या वेलच्या
१२) २/३ लवंगा
१३) ८/१० चक्रीफ़ूले
१४) एक छोटे जायफ़ळ, फ़ोडून
१५) एक टेबलस्पून मोहरी
१६) एक टिस्पून मेथीदाणे
१७) दोन टेबलस्पून दगडफ़ूल
१८) १५ मध्यम आकाराच्या लसणीच्या पाकळ्या सोलून
१९) १ इंच आले पातळ चकत्या करुन
२०) खडा हिंग पावडर, दोन टिस्पून
२१) हळद एक टिस्पून.
२२) दोन टेबलस्पून व्हीनीगर.
२३) तेल, लागेल तसे.

क्रमवार पाककृती:

 

१) धण्यापासून जायफ़ळा पर्यंत सर्व मसाले कोरडेच मंद आचेवर भाजून घ्या. जसजसे भाजून होतील तसतसे एका कपड्यावर किंवा पेपरवर पसरुन टाका. जिरे घेताना, साधे जिरे व शहाजिरे अर्ध्या अर्ध्या प्रमाणात घेतले तर चांगले. (तीळ भाजताना झाकण ठेवा, किंवा फ़डक्याने घोळवत भाजा, कारण ते उडतात.)
२) मोहरी पांढरी होइपर्यंत भाजा. मेथी भाजताना मात्र अर्धा चमचा तेल टाकून ती गुलाबी करुन घ्या. मग मेथी दाणे काढून दगडफ़ूल परतून घ्या. व मसाल्यावर टाका.
३) आता खोब-याचा किस भाजायला घ्या. अगदी मंद आचेवर सतत परतत तो तपकिरी सोनेरी रंगावर भाजा. आणि मसाल्यात न मिसळता वेगळा ठेवा.
४) आता तेल सोडून कांदा भाजायला घ्या. सगळा कांदा एकेरी थरात येईल इतके पसरट पॅन वापरले तर कांदा नीट भाजला जातो. हा अगदी मंद आचेवरच भाजायचा आहे. हवे असेल तर यात अर्धा चमचा मीठ घाला. कांदा भाजायला खूप वेळ लागतो पण सारखे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. न करपवता तो एकसारखा तपकिरी सोनेरी रंगावर भाजायला हवा. कांदा भाजत आला कि त्यात हळद व हिंग टाका. आणि गॅस बंद करा.
५) कांदा थंड झाला की त्यात लसूण व आले मिसळून घ्या.
६) आता कोरडे मसाले मिक्सरवर बारीक दळून घ्या, व एका ताटात काढा. दोन तीन घाणे केले तर कोरडी पावडर हाताने नीट मिसळून घ्या.
७) मग खोबरे बारिक करा. खोबरे बारीक करताना तेल सुटते, म्हणून दोन तीन वेळा मिक्सर उघडून कडेला चिकटलेले खोबरे मोकळे करा, आणि मसाल्यावर टाका.
८) मग कांदा बारिक करायला घ्या. यावेळी पण मिक्सर जाम होईल, पण तो मोकळा करत बारीक वाटा. लागलेच तर थोडे तेल टाका.
multipurpose masala tayari

 

 

 

 

९) या मसाल्यात कोथिंबीर पण घालता येईल. घालायची असल्यास पाला मोकळा करुन जरा वा-यावर सुकवा. मग किंचीत तेलावर परता आणि न वाटता मसाल्यात मिसळा.
१०) आता ही तिन्ही वाटपे हाताने नीट मळून घ्या. त्यात व्हीनीगर घाला. (व्हीनीगरने मसाला टिकतोच शिवाय त्याचा स्वाद जास्त खुलून येतो.) आणि याचे लिंबाएवढे गोळे करुन घट्ट मळून घ्या. हे लाडू हवाबंद डब्यात भरुन मुंबईत असाल तर फ़्रिजरमधे आणि पूण्यासारख्या कोरड्या हवेच्या ठिकाणी असाल तर फ़्रिजमधे ठेवा. हे लाडू वळताना उत्तम वास आला पाहिजे.
११) या प्रमाणात १५ ते २० लाडू होतील. आता यापैकी एकच लाडू वापरुन केलेले पदार्थ बघू या.
१२) या मसाल्यात लाल तिखट वा मीठ नसल्याने, ते प्रत्येक पदार्थात आयत्यावेळी चवीप्रमाणे घाला.

 

अ) ओल्या काजूची उसळ

अर्धा किलो ओले काजू किंवा सुकवलेले ओले काजू, भिजवून सोलून घ्या. हे काजू काही मोजकेच महिने बाजारात असतात. एरवी करायची असेल तर भाजलेले काजू वापरा. पण ते गरम पाण्यात भिजवून, पाणी निथळून घ्या. दोन बटाटे उकडून सोलून घ्या. चमचाभर तेलाची फ़ोडणी करुन त्यात एक बारिक चिरलेला कांदा टाका. तो परतून घेऊन त्यात दोन टोमॅटॊ बारिक चिरुन टाका. ते परतून एकजीव झाले कि त्यात लाल तिखट टाका व परता. मग काजू टाका. जरा परतून भरपूर पाणी टाका. झाकण ठेवून काजू शिजू द्या. ते शिजले कि त्यात बटाट्याच्या फ़ोडी टाका. उकळी आली की वरील एक गोळा, हाताने कुस्करुन टाका. चवीप्रमाणे मीठ टाका. एक दोन उकळ्या आल्या कि भाजी तयार.

 

ब) सूरणाची भाजी वा बटाट्याची भाजी अर्धा किलो सुरणाच्या चौरस फ़ोडी करुन, चिंचेच्या पाण्यात ठेवा. मग निथळून घ्या.तेलाची जि-याची फ़ोडणी करुन त्यात या फ़ोडी घाला. परतून पाणी घालून शिजवा. चिंचेचा कोळ टाका. मग मीठ व तिखट टाका. उकळी आली कि मसाल्याचा गोळा कुस्करुन टाका. व जरा उकळू द्या. अशीच उकडलेल्या वा कच्च्या बटाट्याची करा. नुसते बटाटे असतील तर चिंचेच्या जागी, टोमॅटो वापरा. दोन्हीची एकत्र भाजी पण छान लागते.

 

क) वांग्याची भाजी अर्धा किलो काळ्या वांग्याच्या फ़ोडी करुन फ़ोडणीवर परतून घ्या. यात हवे तर ओले पावटे पण घालता येतील. टोमॅटो वा चिंच वापरा. पाणी घालून भाज्या शिजू द्या. मग मसाल्याचा एक गोळा कुस्करुन टाका.

 

ड) कडधान्याच्या उसळी

काळे चणे, काबुली चणे, लाल वा पांढरी चवळी, ओले किंवा सुके डबलबीन्सची हा मसाला वापरून छान भाजी होते. ही कडधान्ये, गरज असतील तर भिजवून घ्या. कूकरमधे जिरे किंवा ओव्याची फ़ोडणी करुन कडधान्ये शिजवून घ्या. मग त्यात तिखट मीठ घालून उकळा व या मसाल्याचा एक गोळा कुस्करुन घ्या. पाव किलो सुक्या कडधान्याला एक गोळा पुरेल. काळ्या चण्यात जास्त पाणी वापरुन रस्सा करता येईल. आवडीप्रमाणे बटाटे वापरा.

 

इ) अंड्याची आमटी

तेलाची फ़ोडणी करुन बारिक चिरलेला एक मोठा कांदा परतून घ्या. त्यात तिखट, मीठ घालून पाणी ओता. पाण्याला उकळी आली एक मसाल्याचा एक गोळा कुसकरुन टाका. परत उकळी आली कि त्यात ३ ते ४ अंडी फ़ोडून टाका. किंवा उकडून सोलून एक चिर देऊन टाका.

 

फ़) मिश्र डाळींची आमटी. चण्याची, तुरीची, मूगाची, मसूराची, वालाची अश्या डाळी घ्या. चण्याच्या डाळीचे प्रमाण जास्त ठेवा. नुसती चण्याची डाळ घेतली तरी चालेल. त्या कूकरमधे शिजवून घ्या, पण घोटू नका. (सर्व डाळी मिळून दिड वाटी) तेलाची किंवा तूपाची, जिरे मोहरी व कढीलिंबाची फ़ोडणी करा. त्यात पाणी ओतून तिखट मीठ घाला. मसाल्याचा एक गोळा कुसकरुन टाका. पाण्याला उकळी आली कि शिजवलेल्या डाळी टाका.

 

ग) चिकन किंवा मटण अर्धा किलो चिकन किंवा मटणाचे बेताचे तूकडे करुन, त्यांना आले, लसणाचे वाटण लावा. कूकरमधे किंचीत तेल तापवून त्यात ते तूकडे परतून घ्या. मग पुरेसे पाणी टाकून ते तूकडे शिजवून घ्या. कूकर उघडून तिखट, मीठ व हा मसाला टाका.व जरा उकळू द्या.

वाढणी/प्रमाण:

प्रत्येक स्वतंत्र पदार्थ चार जणांसाठी

अधिक टिपा:

 

वरील सर्व कृतीत शेवटी कोथिंबीर टाकू शकता. तसेच जर जास्त रस हवा असेल तर मसाल्याचा आणखी अर्धा गोळा वापरा.

 

व्हीनीगर वापरायलाच हवे असे नाही. पण जर पाण्याचा हात लागला, तर एवढ्या मेहनतीने केलेल्या मसाल्याला बुरशी लागू शकते. ती लागू नये म्हणून हि खबरदारी.

माहितीचा स्रोत:

स्वतःचे प्रयोग.

 

 

Multipurpose Masala

I prefer aromatic masala which is not so hot. I have been preparing my own masala. I am sharing my secret recipe here. This can be kept in refrigerator, upto a year and will not loose its flavor. As the name suggests, it can be used for various vegetables and even for egg or chicken curry.

 

It is true that this preparation requires many ingredients and requires few hours of efforts, but it is a one time task. Once it is ready, the vegetable curry can be made in matter of minutes.

If you use this masala, you do not need any other spices except salt and chili powder. This masala will

also thicken the gravy.

Let us see the ingredients :-

1) 1 Kg sliced onion. ( We need to fry the sliced onion in oil, and it takes lot of time. To save some time, you can dry the sliced onion on a sunny day, to save the time on frying. In some towns, readymade dry onion is available, if you can get it, it will save lot of your time. 250 grams of dry onion, should be enough.)

2) 1 ½ cup desiccated coconut

3) 1 cup coriander seeds

4) ½ cup cumin seeds ( you can take mix of brown and black cumin seeds )

5) ½ cups sesame seeds

6) ½ cup poppy seeds

7) ¾ cup aniseeds ( saunf)

8) 2 tablespoons black pepper corns

9) Only seeds from 6 black cardamom ( badi ilayachee )

10) 2 inches cinnamon

11) 10 green cardamom

12) 2 cloves

13) 8 star anise

14) 1 small nutmeg

15) 1 tablespoon mustard seeds

16) 1 teaspoon fenugreek seeds

17) 2 tablespoon patthar fool

18) 15 garlic pods, peeled

19) 1 inch ginger, sliced

20) 2 teaspoon brown asafetida powder

21) 1 teaspoon turmeric powder

22) 2 tablespoon white vinegar

23) oil as required.

24) Salt

To make the masala

 

1) Dry roast all spices in the list from coriander seeds to nutmeg, separately till aromatic. Spread them on a clean kitchen towel.

 

2) Roast mustard seeds till they turn white. Then remove from pan and add ½ teaspoon oil and fry fenugreek seeds till they turn pink. Remove fenugreek seeds and roast patthar fool. You can mix all these spices.

 

3) Now roast the desiccated coconut, on very low flame, till it turns golben brown. You need to stir continuously, to save it from burning. Remove and keep separately from the roasted spices.

 

5) Then add some oil and fry the onion on very low flame, till it turns golden brown. It takes lot of time to fry onion, but you should not hurry. You may add little salt to speed up the process. Once the onion is fried add turmeric and asafetida to it and remove from fire.

 

6) When the onion cools slightly add the garlic and ginger to it. ( Ginger and garlic are not to be cooked. )

 

7) Now dry grind all spices to a fine powder. Take it out in a bowl.

 

 

8) Then grind the desiccated coconut. It will give away lot of oil and you need to scrap down the edges of your mixer, several times. Remove the coconut in the same bowl.

 

9) Now grind the fried onion. This will be bit tricky. You may add little oil in case the mixer jams.

 

10) If you prefer, you can add fresh coriander also to this masala. If you want to, chop it and dry in shade and then add ( It is not to cooked.)

 

11) Now add all the ground masalas ( and fresh coriander, if using ) and mix them very well with your hands. Add the vinegar. ( It acts as preservative and improves the taste ) and form lemon size balls. You need to press the mixture by hand, so that the balls are hard. Put them in airtight container and keep it in freezer compartment of your refrigerator. You will need just one of these balls, to prepare a dish for 4 persons. You will need to add salt and red chili powder, at the time of making a dish.

 

 

Here are some ideas

 

A ) Fresh cashew nuts curry

 

In season, you will get fresh cashew nuts in market. These are removed from kernels, when the kernels are still green. If you can not find them you can use the normal roasted cashew nuts.

You need to soak all types and peel them, if necessary.

If you take ½ kg of nuts, you can heat a tablespoon of oil and fry a medium sized chopped onion and

fry it. Then add two chopped red tomatoes and fry till oil separates. Add red chili powder and the cashew nuts. Add enough water to cover the nuts. Let the water boil and nuts cook. Then add salt and one masala ball. ( You need to crush it, if it has become hard. ) Boil for 2 minutes and your gravy is ready.

 

 

  1. B) Yam and potato curry

 

Cube ½ kg yam (suran) and soak the cubes in tamarind water for ½ hour. Heat some oil and fry cumin seeds. Add yam cubes and fry a little. Add water and let it boil. Add tamarind pulp. Simmer till the yam gets cooked. Add salt, red chili powder and one ball of this masala.

 

You can cook potatoes too, in this style. For potatoes, you can replace tamarind pulp with tomato.

multipurpose masala batata bhaji

 

C) You can cook eggplant with this masala. You can add fresh peas with them.

 

D) You can use this masala for pulses like black channa, Red or white chowli, Chhole, Double beans, (butter beans ) etc. You need to soak and pressure cook these pulses.

 

E ) Egg curry

 

Heat some oil and fry chopped onion. When it turns brown add salt and red chili powder. Add water and boil. Then add one ball of this masala. When the water boils again break 3 to 4 eggs ( one by one ) directly in boiling water. If you prefer them whole, you can hard boil the eggs, and then add to this curry.

G) Chicken or Mutton

 

Marinate the pieces in ginger garlic paste. Heat oil in pressure cooker and fry those pieces. Add salt, chili powder and water. Pressure cook the pieces. Open the cooker and add one ball of masala ( for ½ kilo )

2 thoughts on “मल्टीपर्पज मसाला / Multipurpose Masala

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s