गुपचुप बटाटे / लबाड बटाटे – Crazy Potatoes ( Potatoes stuffed with green peas )

For English version, please scroll down

crazy potatoes

लागणारा वेळ:

१ तास

लागणारे जिन्नस:

१) पाच ते सहा सारख्या आकाराचे बटाटे. २) एक कप हिरवे मटार ३) आले, मिरची, लसूण यांचे ताजे वाटण, एक टेबलस्पून ४) एक टेबलस्पून बेसन किंवा रवा ५) कोथिंबीर ६) मीठ, हिंग, हळद, साखर, लिंबू ७) तेल

 

क्रमवार पाककृती:

 

१) बटाट्याची साले पीलरने काढून टाका.
२) बटाट्याच्या एका बाजूने बटाटा पोखरायला घ्या. यासाठी जून्या पद्धतीचा पीलर चांगला.
३) बटाट्याच्या कडेचा अर्धा सेमीचा भाग अखंड रहायला हवा. बटाटे मिठाच्या पाण्यात ठेवा.
४) एक टेबलस्पून तेल तापवून, त्यात हिंग हळदीची फोडणी करा ब त्यावर वाटण टाका. (थोडे वाटण बाजूला ठेवा.)
५) त्यावर मटार टाका, मीठ टाका व झाकण ठेवून मंद आचेवर मटार शिजू द्या. हवा तर त्यात बटाटे पोखरुन काढलेला गर पण टाका.
६) मटार चांगले शिजले कि त्यात रवा किंवा बेसन टाका जरा परतून, डावेने थोडे मटार ठेचून घ्य.
७) हे झाले सारण. त्यात थोडा लिंबूरस टाका. साखर टाका, सारण थोडे झणझणीत पाहिजे.
८) बटाटे बुडतील इतके पाणी घेऊन त्यात मीठ घाला व ते उकळत ठेवा.
९) पाणी उकळले कि बटाटे त्यात टाकून अर्धवट उकडून घ्या, बटाटे फुटणार नाहीत याची काळजी घ्या.
१०) बटाटे करकरीतच रहायला हवेत, त्यामूळे अर्धा एक मिनिटातच गॅस बंद करा आणि बटाटे निथळून घ्या.
११) सारण आणि बटाटे पुरते थंड होऊ द्या.
१२ ) सारण हाताने थोडे मळून घ्या.
१३) बटाट्याला आतून थोडेसे वाटण व मीठ चोळा.
१४) मग बटाट्यात सारण भरा, भरताना किंचीत दाब द्या, पण बटाटा मोडणार नाही याची काळजी घ्या.
१५) आता भर तेलात एकेक बटाटा तळून घ्या. अलगद हाताळा. सारण बाहेर येता कामा नये.
१६) किचन टॉवेलवर काढून पुरते तेल निपटून घ्या.
१७) टोमॅटो सॉस, चाट मसाला, दही, चिंचेची चटणी याबरोबर खा.

 

वाढणी/प्रमाण:

दोन ते तीन लोकांसाठी

अधिक टिपा:

हा तसा आपला पारंपारिक पदार्थ आहे. पण यासाठी भरपूर पेशंस आणि थोडे कौशल्य हवे. बटाटा पोखरण्यात बराच वेळ जातो. पण चवीला मात्र मस्त लागतो. समजा बटाटा पोखरायला नाहीच जमले तर याच सारणाचे पॅटीस करता येतील. बटाटे पूर्ण उकडून मॅश करुन त्यात मैदा वा रवा मिसळून कव्हर करा. ढेमसे, पडवळ, सिमला मिर्ची पण वापरता येतील. आणि ते वापरणे सोपेही पडेल. वांगी वापरता येतील, पण ती पोखरणे बटाट्यापेक्षा कठीण आहे.

 

माहितीचा स्रोत:

पारंपारीक आहे आणि रुचिरात कृति आहे. पण ओगले आज्जीनी बटाटे पोखरुन, उकडून साल काढायला सांगितलेले आहे, ते फार कठीण जाते. शिवाय त्यांनी बेसनाचा घोळ करुन त्यात बटाटे बुडवून तळायला सांगितले आहे.

 

 

Crazy Potatoes ( Potatoes stuffed with green peas )

crazy potatoes

 

 

As the name suggests, this is really a crazy recipe. The idea is that the potatoes should look intact from outside, but should have a spicy stuffing inside. It does take some time to make these potatoes, and I dare not call it healthy !

What you need –

1) 5 to 6 potatoes, preferably of same size

2) 1 cup green peas ( preferably frozen )

3) Freshly made paste of 3 green chiles, 1 inch ginger and 7/8 garlic pods

4) 1 tablespoon semolina or gram flour ( besan )

5) ½ cup chopped corriander

6) Salt to taste

7) A pinch of asafetida

8) ½ teaspoon turmeric

9) ½ teaspoon sugar

10) Juice of half lime

11) Oil as required

 

 

To make these potatoes

1) Peel the potatoes.

2) Now start carving the potatoes from inside to create a cavity for stuffing. You can use the peeler to do this. You need to keep an outer shell of about ½ cm intact. (This is bit tricky.)

3) Keep the carved out bits of potatoes aside and drop the shells in salted water.

 

4) Heat 1 tablespoon oil in a pan and add asafetida and turmeric and fry the chili garlic paste ( Reserve about ½ teaspoon paste.)

5) Add the peas, salt and the carved out bits of potatoes, cover and cook on medium flame.

 

6) After the peas are cooked, add the semolina or gram flour and mix well. Add sugar and cook for 2 minutes. Remove from fire.

 

7) Add lime juice and crush the peas a little, add chopped corriander and mix well. This is the stuffing.

8) Put the potatoes in boiling water for a half minute and drain immediately.

 

9) Let the potatoes and stuffing cool completely.

 

10) Add salt to the chili ginger paste, which was kept aside. Rub this mixture to the potatoes from inside and outside.

 

11) Stuff the potatoes with the green peas mixture.

 

12) Deep fry the potatoes till they turn golden from all the sides. Ensure that the stuffing remains inside. Take out on kitchen

 

13) Enjoy with tomato ketchup, curds or sweet chutney.

 

Additional tips

 

The carving of potatoes is bit tricky. You can use Tinda, Capsicum, Green tomatoes, snake guard also. These vegetables have natural cavity and stuffing them is easy.

 

 

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s