जैसलमेरी चटपटे चने / Jaisalmeri Chana

For English version, please scroll down

 

लागणारा वेळ:

३० मिनिटे

लागणारे जिन्नस:

आपल्या नेहमीच्या छोल्यांपेक्षा फार कमी श्रमात होणारे, आणि चवदार !

 

 

Jaisalmeri chana.png

 

१) पाव किलो हरभरे / चणे ( कडधान्य ) – १० ते १२ तास भिजवलेले २) दोन कप दही ३) १ टिस्पून साजूक तूप ४) २ मसाला वेलचीचे दाणे ५) २ इंच दालचिनी ६) २ लवंगा ७) १ टेबलस्पून बेसन ८) १ टिस्पून हळद ९) २ टिस्पून लाल तिखट ( आवडीप्रमाणे कमीजास्त ) १०) १ टिस्पून आमचूर ( टिप पहा ) ११) १ टिस्पून चाट मसाला १२) चिमूटभर जिरे १३) चवीप्रमाणे मीठ १४) दोन हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून १५) दोन टिस्पून धणेपूड ( ताजी केली तर चांगली ) शिवाय वरुन घेण्यासाठी १ मोठा कांदा, जास्तीचे लाल तिखट / चाट मसाला

 

क्रमवार पाककृती:

 

१) वेलचीचे सात आठ दाणे व एक लवंग जरा ठेचून चण्यात मिसळावे व चणे प्रेशरकूकरमधे मऊ उकडून घ्यावेत. ( प्रेशर आल्यानंतर गॅस मध्यम करुन, १० मिनिटे शिजवावेत ) मग पाणी काढून घेऊन डावेने जरा ठेचावेत. सहज ठेचले जातील एवढे शिजवणे गरजेचे आहे. तसे शिजले नसतील तर परत कूकरमधे शिजवून घ्यावेत.

 

२) वेलचीचे बाकीचे दाणे, एक लवंग व दालचिनी हे जरा भाजून त्याचे जाडसर कूट करावे. धण्याची पूड करायची असेल तर तेही जरा भाजून बारीक पूड करावी.

 

३) बेसन, हळद, लाल तिखट, धन्याची पावडर, चाट मसाला, आमचूर हे सगळे एकत्र करुन त्यात थोडे थोडे दही घालत चांगले घोटून घ्यावे.

 

४) साजूक तूप तापवून त्यात जिरे व वरची लवंग / दालचिनी / वेलची पूड टाकावी मग मिरच्यांचे तूकडे टाकावेत.

 

५) मग त्यावर चणे टाकावेत व ते जेमतेम बुडतील एवढेच पाणी टाकावे ( चणे शिजवलेले पाणी वापरू नये, त्याचे सार / कढण करता येईल. )

 

६) त्यात मीठ टाकून जरा उकळावे

 

७) मग त्यात वर तयार केलेले दही घालावे. आणि ढवळून एखाद / दुसरा कढ आणावा. बेसन शिजले कि बास.

कच्चा कांदा कापून त्यासोबत हे चणे खावेत वरुन लाल तिखट व चाट मसाला भुरभुरावा. हा प्रकार ते जेवणात करतात, फुलक्याबरोबर चांगला लागतो. पण मला तो खाकर्‍याबरोबर जास्त आवडतो.
वाढणी/प्रमाण:

चार जणांसाठी

 

अधिक टिपा:

१) आमचूरानी योग्य ती चव येते आणि घट्ट रस होतो. आमचूर नसेल तर दोन टिस्पून चिंचेचा कोळ वापरता येईल, पण तो दह्यात न मिसळता, फोडणीत चणे टाकले कि त्यात घालावा व जरा उकळू द्यावे.
२) घटक जास्त असले तरी पदार्थाला खटाटोप फारच कमी आहे. चणे भिजवलेले असतील तर पटकन होतो. मी तर पूड करण्यासाठी लाटणेच वापरतो.
३) एवढे शिजवलेले चणे अजिबात बादत नाहीत आणि असे घोटलेले दही फाटतही नाही. दही मात्र फार आंबट असू नये. तसे असेल तर आमचूर कमी घ्यावे.

 

४) ते लोक काळे चणे वापरतात. पण आपले हिरवे चणेही चालतात. काबुली चणे देखील चालतील.

 

माहितीचा स्रोत:

गोव्यातील माझी शेजारीण.

 

 

Jaisalmeri Chana

 

Jaisalmeri chana

 

 

This recipe is quite different from the chhole ( chick pea) recipe. As the name suggests, it from Jaisalmer.

Though you can use the chick peas, if you use black chana, the taste would be better.

 

What you need –

1) 250 grams black chana – soaked in water for 10 to 12 hours

2) 2 cups curd

3) 1 teaspoon ghee (clarified butter)

4) Seeds on two brown (masala) cardamom

5) 2 inch cinnamon

6) 2 cloves

7) 1 tablespoon besan (gram flour)

8) 1 teaspoon turmeric

9) 2 teaspoon red chili powder (or to taste)

10) 1 teaspoon aamchoor powder ( dry mango powder)

11) 1 teaspoon chat masala

12) ½ teaspoon cumin seeds

13) Salt to taste

14) 2 green chilies, slit

15) 2 teaspoon freshly made coriander powder

Plus sliced onion for topping.

To make this chana

 

1) Slightly crush 1 clove and few cardamom seeds and mix with chana. Pressure cook the chana for 10 minutes and drain the water. Slightly crush the chana with spatula. (They should be soft but firm )

2) Slightly roast the remaining cardamom seeds, 1 clove and cinnamon stick and grind to a coarse powder.

3) Mix together besan (gram flour), red chili powder, coriander powder, chat masala and aamchoor ( dry mango powder) and add curd and beat well.

 

4) Heat the ghee in pan and add the cumin seeds and the powder of clove, cinnamon and cardamom. Add the slit green chilies.

 

5) Add the cooked chana and fresh water, just enough to cover them. Add salt to taste and boil for

2 minutes.

6) Lower the heat and add the curd mixture, warm it ( do not boil ) till the besan is cooked.

7) Remove from fire, top with sliced onion and additional red chili powder, chat masala if desired.

 

Some tips…

1) Try to get aaamchoor, as that gives the better taste and makes the gravy thick. In case, you can not get it, you can use tamarind pulp, instead.

2) Though the list of ingredients, may seem lengthy, these are common spices and if the chanaa are already soaked, this dish does not take long.

3) Chanaa cooked in this fashion, will not be hard on your system.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

2 thoughts on “जैसलमेरी चटपटे चने / Jaisalmeri Chana

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s