रंगीबेरंगी भाज्यांची न्याहारी / Breakfast with vegetables

For English version, please scroll down

 

आपले बहुतेक  न्याहारीचे प्रकार हे धान्य किंवा कडधान्य यावर आधारीत असतात. त्यात भाज्या असतील तर नावालाच किंवा पुरक घटक म्हणुन. मला स्वतःला भाज्यांचा पाया असलेली  न्याहारी आवडते. त्यात धान्यांचा वापर कमीच असतो.

 

माझी वैयक्तीक आवड जरी असली, तरी अशी न्याहारी दिसायला सुंदर दिसते, चवीला उत्तम असते, आहार घटकांनी युक्त असते शिवाय अंगावर येत नाही.

 

अश्या न्याहारीचे ३ प्रकार आज देतो आहे.

 

१) चेरी टोमॅटो

 

cherry tomatoes dish1

यासाठी अर्थातच चेरी टोमॅटो हवेत. यांना स्वतःची अशी एक खास चव असते, त्यामूळे मला तर मीठ सुद्धा वापरायची गरज वाटत नाही. पाव किलो टोमॅटो घेतले तर १ कप कोंडा असलेली कणीक घ्यायची. ( तशी नसेल तर  होल व्हिट पावाचा चुरा, व्हीटा बीक्स चा चुरा वगैरे वापरू शकता ) याशिवाय २ टीस्पून  बटर आणि चव वाढवण्यासाठी चाट मसाला, मिरपूड, चीज, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबूरस, किसलेले चीज, पनीर वगैरे   घेऊ शकता.

 

cherry tomatoes ingredients1

 

कृती अगदी सोपी.

कढईत १ टिस्पून बटर तापवून त्यात  टोमॅटो थोडे परतून घ्या. मग ते बाहेर काढून  कढईत बाकीचे बटर घाला, व त्यात कणीक (किंवा पर्याय  भाजून घ्या. त्यावर पाण्याचा हबका मारून ते शिजू द्या. मग परतून ते मोकळे करुन घ्या आणि त्यात टोमॅटो मिसळा आणि गॅस बंद करा. ते डिशमधे काढून बाकीचे घटक आवडीप्रमाणे घेऊन त्यात मिसळा.

 

 

२ ) चवळीच्या शेंगा

Long beans raw

 

 

 

चवळीच्या कोवळ्या शेंगा नुसत्याही खायला छान लागतात. पण त्या खुप प्रमाणात आपण खाऊ शकत नाही.

त्यासाठी त्या अगदी बारीक कापून, पटकन शिजवल्या तर चांगले. या अगदी बारीक कापण्यासाठी मी

एक युक्ती वापरली. एखाद्या पाण्याच्या बाटलीचा झाकणाकडचा  निमुळता भाग, फोटोत दिसतोय त्याप्रमाणे

कापून घ्या. शेंगांचा देठाकडचा तुकडा आणि शेवटचा तुकडा कापून  टाका.

मग त्या शेंगापैकी  जितक्या मावतील  तितक्या शेंगा त्या झाकणातून सरकवा आणि मग धारदार सुरीने त्या

कापून  घ्या. एकदा नक्की करुन पहा, या युक्तीने या शेंगा ( आणि इतरही बारीक शेंगा ) फार बारीक कापून

होतात.

 

 

Long beans cut

 

या शेंगाशिवाय आपल्याला एखादा बटाटा ( चौरस तुकड्यात कापलेला ), शेंगदाणे , लाल मिरची, हिंग आणि

मीठ लागेल. फोडणीपुरते तेल आणि जिरे पण लागेल.

Long beans tayari

 

 

 

तेलाची फोडणी करून त्यात जिरे, हिंग आणि लाल मिरच्या परता मग त्यात शेंगदाणे परता आणि त्यावर

बटाट्याच्या फोडी परता. झाकण ठेवून त्या शिजू द्या मग त्यावर  कापलेल्या शेंगा आणि मीठ टाका.

दोन मिनिटे परता आणि दोन मिनिटे झाकण ठेवून शिजू द्या. मीठ घाला.

Long beans dish

 

 

बटाटा आणि शेंगदाणे देखील ऐच्छिक आहेत. यावर खाताना ओले खोबरे, कोथिंबीर वगैरे घालू शकता. लिंबू पण पिळू शकता.

 

३ ) ब्रोकोली आणि लाल भोपळा

Pumpkin brocoli shapes

 

 

हिरवीगार ब्रोकोली आणि केशरी पिवळा भोपळा हे कॉम्बिनेशन दिसायलाही फार सुरेख दिसते. दोन्ही भाज्या

आरोग्याला हितकारक आहेत पण त्या फार शिजवून चालत नाहीत. या डिशमधे मी हा समन्वय  साधायचा

प्रयत्न केलाय. ब्रोकोलीचा किंचीत कडवटपणा, भोपळ्याच्या गोड चवीमूळे झाकला जातो.

 

यासाठी आपल्याला ब्रोकोली, लाल भोपळा ( किंवा स्क्वॅश, बटरनट सारख्या भाज्या) आणि मका ( किंवा

आवडीचे दाणे ) लाल मिरची, मीठ आणि बटर लागेल.   त्याशिवाय ब्रेडचे  छोटेसे चौकोनी तूकडे

लागतील. अर्थात हे सर्व पूरक घटक, ऐच्छिक आहेत.

pumpkin brocoli dish

 

 

आधी भोपळा किंवा तत्सम भाजीचे चौरस तूकडे करुन घ्या. ब्रोकोलीचे तूरे काढून घ्या. थोडेसे बटर तापवून

त्यात ब्रेडचे चौकोनी तुकडे परतून कुरकुरीत करुन घ्या. ते बाहेर काढून त्यात लाल मिरचीचे तूकडे

परता मग त्यावर भोपळ्याच्या फोडी घालून परता. मीठ घालून झाकण ठेवून फोडी शिजवून घ्या.

मके किंवा इतर दाणे वापरत असाल , तर ते या फोडींसोबतच शिजवा.

मग या फोडी आणि दाणे बाहेर काढून त्या भांड्यात थोडे बटर घालून ब्रोकोलीचे तूरे पसरून घाला.

त्यात अर्धा कप पाणी आणि मीठ घालून, झाकण ठेवा. मिनिट भराने झाकण काढून  राहिलेले पाणी

पुर्णपणे आटवून घ्या. आता सगळे एका डिशमधे आकर्शक रित्या मांडा, आणि आस्वाद घ्या.

 

हे ३ प्रकारचे ब्रेकफास्ट्स नक्की ट्राय करुन पहा.

 

Breakfast with cherry tomatoes / Long beans / broccoli

 

Most of our breakfast preparations are based on grains and pulses. If at all any vegetables are used, they are supplementary. I love to have my breakfast with lots of vegetables, with supplements of grains and pulses.

 

Not only they look great, but also they are not heavy on your system. You can plan some household chorus, after this breakfast.

 

1) Breakfast with cherry tomatoes

 cherry tomatoes dish1

You will of course need cherry tomatoes. They are so full of flavour, I do not even use salt with them.

If you take 250 grams, cherry tomatoes, you will need 1 cup of whole meal flour with bran. ( You may even use bread crumbs or other commercially available bran products ). You will also need

2 teaspoon butter. To top you may use chat masala, black pepper, green chilli, fresh coriander,

Grated cheese, cottage cheese etc.

 

To proceed

 

Heat one teaspoon butter and add the whole cherry tomatoes. Fry them for a minute and remove. Add the remaining butter and the flour ( or substitutes ) and fry for a minute. Sprinkle some water

and let it cook. Add the tomatoes, mix well and remove from fire. Top with the other ingredients

of choice and enjoy.

 

2) Long beans

Long beans dish close up

 

 

Long beans ( chowli beans ) can be eaten raw, they taste good. But you cannot eat them in large quantities. If you cut them fine, they require minimum time to cook and still retain the crunch.

I would suggest a trick to cut them fine. Cut a neck of a plastic water bottle. Tip and tail the beans, and pass as many as possible, beans thru the neck of the bottle ( as shown in picture above )

This way you can cut them very fine.

 

Apart from these beans, you would need, a potato ( cubed ), few groundnuts, Red chilli, asafoetida, salt, cumin seeds and little oil.

 

To proceed

Heat oil and add cumin, asafoetida and red chilli. Add the groundnuts fry for a while ( take care, as they try to fly away from the pan ) and then add potato cubes. Cover and let the potato cook. After it is cooked add the beans. Stir for 2 minutes, cover and cook for 2 more minutes, add salt and remove from fire.

You can top the beans with fresh coriander and grated coconut. Add some lime juice before eating.

The potato and nuts are optional.

 

3) Broccoli and pumpkin

pumpkin brocoli dish close up

 

 

Dish of fresh green broccoli and golden yellow pumpkin ( or squash ) is a visual treat. They are good for health too. The slight bitterness of broccoli is masked by sweet pumpkin ( and other nuts, if using.)

You will also need sweet corn, red chilli flakes, salt and butter. You may supplement this dish with croutons ( small bread cubes.)

 

To proceed,

Cube the pumpkin ( or squash ) and cut broccoli in small florets. Heat some butter and fry the bread pieces till crispy. Remove from pan and add chilli flakes and fry for a while.

Add pumpkin pieces, fry for a while. Cook covered till done. Sprinkle salt and keep aside.( If using corn, add and cook with pumpkin. )

Now add some more butter and broccoli. Add ½ cup water and salt. Cover and cook for a minute. Remove the cover and cook till almost all water is absorbed.

 

Assemble all in a dish and enjoy.

 

2 thoughts on “रंगीबेरंगी भाज्यांची न्याहारी / Breakfast with vegetables

 1. व्वा… अगदी वेळेवर रंगीबेरंगी भाज्या दिल्यात….मला काहितरी हव होत भाज्यातलं…पण कसं असावं/करावं सुचत नव्हतं….पण “रंगीबेरंगी भाज्यांची न्याहारी” बघुन मनात कसं करायचं ते सुचतेय…

  कारण….

  उद्यापासुन भाच्याची शाळा सुरु होतेय… शाळा IES Kings Gorge (राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी)… वेळ : ९ ते २.३०…. २ रिसेस, एक १०.३० आणि दुसरी १२.३०…. पहिली न्याहरीसाठी, दुसरी जेवणासाठी….

  आमच्याकडे अगदी रोजच्या रोज भाज्या/फळ्भाज्या असतातच…बाळराजे घरी जरा नाटक करतात…पण शाळेत इलाज नसतो 🙂

  Usha.

  Like

 2. आहा.. काय प्रेझेन्टेशन आहे.. काय सजावट.. आणि नेहमी प्रमाणेच मस्त माहिती. शेंगा कापायची युक्ती आवडली.

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s